सिंधुदुर्गात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न
सिंधुदुर्गात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न

सिंधुदुर्गात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न

sakal_logo
By

74013
सिंधुदुर्गनगरी : येथील शरद कृषी भवन येथील सीएमई कार्यशाळेला उपस्थित डीएईचे सहसचिव सुषमा तायशेट्ये. सोबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व अन्य.

जिल्ह्यात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न

सुषमा तायशेट्ये ः सिंधुदुर्गनगरी येथे ‘सीएमई’ कार्यशाळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणात आरोग्य विभाग सर्व स्तरावरील वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन अधिकाधिक लोकांना याचा फायदा होण्यासाठी काम करणार आहे. त्याकरिता नजीकच्या जिल्ह्यातील कर्करोग रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. जेणेकरून एफॉर्डबल कॅन्सर केअर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असे डीएईचे सहसचिव सुषमा तायशेट्ये (भा.प्र.से.) यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रिवेंशन ऑकॉलोजी आरोग्य सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने व किमोथेरपी डे केअर आरोग्य सेवा अधिक प्रमाणात कार्यान्वित करण्याकरिता सीएमई कार्यशाळा आज येथील शरद कृषी भवन येथे झाली. या एकदिवसीय सीएमई कार्यशाळेवेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बनावली, डॉ. अतुल बुदुक, डॉ. अभय देसाई, डॉ. सुवर्णा गोरे, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. अमय ओक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, निवासी बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, सीव्हीएचओ डब्लूएचओ पुणेचे डॉ. तेजपाल चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दयानंद कांबळी, जिल्हा लेखा व्यवस्थापक आत्माराम गावडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एनसीडी केतन कदम, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एनटीसीपी संतोष खानविलकर, एफएलसी अमित जगताप, जिल्हा समूह संघटक गोपाळ गोसावी, समाज कार्यकर्ता एनटीसीपी कामस अल्मेडा, डीईओ (एनसीडी विभाग) रमेश पंडित, सर्व एनपीसीडीसीएस, एनपीएचसीई, एनपीपीसी, डीएमएचपी, एनपीसीबी विभागांतर्गत सर्व कर्मचारी व अधिपरिचारिका उपस्थित होत्या.
---
प्रभावी आरोग्यसेवेसाठी धडपड
राज्यातील कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात लोकसंख्येवर आधारित तपासणी कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये ३० वर्षांवरील सर्व स्त्रियांची स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोगाच्या आणि तोंडाच्या कर्करोगाच्या प्राथमिक टप्प्यात निदानासाठी तपासणी व जनजागृती केली जाते. या आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी ५ ते ७ जानेवारी या कालावधीत भेट दिली.