संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat8p16.jpg-KOP23L74052 गावतळे ः धनश्रीचा सत्कार करताना जिल्हा शिक्षणाधिकारी वामन जगदाळे व इतर मान्यवर.
------------
धनश्रीच्या गौरवाने भारवली आई
गावतळे ः रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी सुरू केलेल्या ''जाणू विज्ञान, अनुभवो विज्ञान''च्या पहिल्याच वर्षी आमची कन्या धनश्री हिची नासावारीसाठी निवड झाली अन् सर्व थरातून होत असलेला अभिनंदनाचा वर्षाव पाहून मी धनश्रीची आई असल्याचा अभिमान वाटला. धनश्रीमुळे अगदी कृतकृत्य झाल्याचे धनश्रीची आई संजीवनी संजय जाधव यांनी भावना व्यक्त केल्या. जिल्हा शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, कॉमनपूलचे विस्तार अधिकारी कांबळे तसेच पालगड प्रभागाचे विस्तार अधिकारी सुनील सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते धनश्रीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी धनश्रीने आपणास अनेक शिक्षक, अधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.
----------------

स्वयंभू गणेश मंदिरात अंगारकी
चिपळूण : मळ्यातील स्वयंभू गणेश मंदिरामध्ये १० जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि २५ ते ३१ जानेवारी दरम्यान माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरातर्फे संजय देवधर यांनी केले आहे.