
राजापूर-ईश्वर दर्शनासाठी त्याची अखंड भक्ती आवश्यक
ईश्वरा ची अखंड भक्ती आवश्यक
भाई गोसावी महाराज ; संतानी सगुण स्वरूपात देव पाहिला
राजापूर, ता. ८ : मनुष्य जीवनात एकदा तरी इश्वराचे दर्शन घडले पाहिजे, यासाठी त्याची अखंड भक्ती केली पाहिजे. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. त्याचे स्वरूप पाहता यावे म्हणून त्याला संत महंतानी सगुण स्वरूपात पाहिले आहे. खरा देव आपल्याला भेटायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या अंतरंगात डोकावून पाहिले पाहिजे. हे कसं पाहिलं म्हणजे देव भेटेल त्यासाठी सद्गुरू केला पाहिजे, असे प्रतिपादन भाई गोसावी महाराज यांनी शीळ येथे केले.
शीळ येथे वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाचेवतीने अखंड हरिनाम सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयात सकाळच्या सत्रात आदिनाथ सांप्रदायिक अधात्म भक्तीज्ञान प्रसारक ओम सिध्द समाज सेवा ज्ञान मंदिर हातिवले चे ह.भ. प. गुरूवर्य भाई गोसावी महाराज यांचे प्रवचन झाले. अखंड हरिनाम सोहळयाचा आरंभ सकाळी वारकरी विजय बाईत यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई प्रतिमेचे पूजन करून झाले. आरती नंतर वारकरी संप्रदाय मंडळ शीळचा हरिपाठ कार्यक्रम आणि महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ आडवली यांचे वारकरी भजन पार पडले.