रामदास कदम करणार खाडी पट्ट्याचा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामदास कदम करणार खाडी पट्ट्याचा दौरा
रामदास कदम करणार खाडी पट्ट्याचा दौरा

रामदास कदम करणार खाडी पट्ट्याचा दौरा

sakal_logo
By

पान २ साठी


रामदास कदम करणार
खाडी पट्ट्याचा दौरा
खेड, ता. ८ : बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम हे बाळासाहेबांची शिवसेना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यरत झालेले असून, लवकरच ते सुसेरी पन्हाळजे बहिरवली खाडी पट्टाचा दौरा करणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना तालुका सचिव सचिन धाडवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी अनेक जुने ज्येष्ठ कार्यकर्ते कदम यांना त्यांच्या जामगे येथील निवासस्थानी येऊन भेटत आहेत. चिपळूण, गुहागर, धामणंद पंधरागाव तसेच लोटे परिसरातूनही अनेक सरपंच, लोकप्रतिनिधी त्यांची भेट घेऊन दौरा करण्याची मागणी करीत आहेत. याबाबत जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण गुहागर मतदारसंघात नियोजन करत असून, खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, संघटक मनोज आंब्रे, महिला आघाडी संघटक सुप्रिया पवार, समन्वयक संजना कुडाळकर, तालुका संघटक सान्वी आंब्रे, युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते, तालुका अधिकारी सुरज रेवणे, व सहकारी संयुक्त दौरा करीत असून विभागातील आजी माजी पदाधिकारी, सरपंच शाखाप्रमुख रामदास कदम यांच्या दौऱ्याची तयारी करीत आहे.