वराड-सोनवडे पूल अपूर्णावस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराड-सोनवडे पूल अपूर्णावस्थेत
वराड-सोनवडे पूल अपूर्णावस्थेत

वराड-सोनवडे पूल अपूर्णावस्थेत

sakal_logo
By

74067
सोनवडे ः वराड-सोनवडे पुलाच्या अपूर्णावस्थेत असलेल्या कामाबाबत वराड सरपंचांसह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वराड-सोनवडे पूल अपूर्णावस्थेत

ग्रामस्थांकडून पाहणी; २६ पर्यंत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : मालवण आणि कुडाळ तालुक्याला जोडणाऱ्या कर्ली नदीवर बांधण्यात येणाऱ्या बहुप्रतीक्षित वराड- सोनवडे पुलाचे काम चार वर्षे होत आली तरी अपूर्ण आहे. हे काम धीम्यागतीने सुरू असल्याने आज वराड सरपंच शलाका रावले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, सोनवडे ग्रामस्थ यांनी पुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ना कामगार ना बांधकाम साहित्य अशी परिस्थिती निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत पुलाच्या ठिकाणीच सभा घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, येत्या २६ जानेवारीपूर्वी वराड-सोनवडे पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू न झाल्यास २६ जानेवारीला वराड आणि सोनवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रखडलेल्या कामाच्या ठिकाणी कर्ली नदीपात्रात उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी सरपंच रावले यांच्यासह प्रमोद धुरी, बबन पांचाळ तसेच वराड, सोनवडे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
आदेश २०१८ला तरीही...
वराड सोनवडे पुलाच्या कामाचा कार्यांरंभ आदेश १९ ऑक्टोबर २०१८ ला देण्यात आला. त्यानंतर हा पूल १८ एप्रिल २०२० पर्यंत बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु अद्याप फक्त ६० टक्केच काम पूर्ण झाले असून ४० टक्के काम अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे काम सुरू होऊन चार वर्षे पूर्ण झाली तरी पुलाचे काम अपूर्ण असल्याची खंत यावेळी व्यक्त झाली.
---
...अन् ग्रामस्थ आक्रमक
सध्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कोणतेही काम सुरू नसल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. त्यामुळे आक्रमक होत वराड-सोनवडे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. वराड सरपंच रावले यांनी पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर काम सुरू करावे, असे प्रशासनाला आवाहन केले.