रत्नागिरी- सायकल देवतेच्या पालखीची रंगली मिरवणूक
फोटो ओळी
-rat८p२४.jpg- वKOP२३L७४०८०रत्नागिरी : जिल्हा सायकल संमेलनात सायकल देवतेची पालखी नाचवताना सायकलप्रेमी.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
सायकल देवतेच्या पालखीची रंगली मिरवणूक
जिल्हा सायकल संमेलन ; पालकांनी मुलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन द्यावे
रत्नागिरी, ता. ७ : कोकणात शिमगोत्सवात ज्या पारंपरिक उत्साहात, वाद्यांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक काढतात. त्याच उत्साहात आज ढोल-ताशांचा गजर करत सायकल देवतेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या पालखीत लहान सायकल विराजमान झाली होती. निमित्त होते रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे. सायकलची ही आगळीवेगळी पालखी नाचवण्यासाठी सायकलप्रेमींची गर्दी झाली. हा नावीन्यपूर्ण प्रयोग यंदा प्रथमच करण्यात आला. त्यानंतर धुपाटणे फिरवून आणि घंटानाद करून गाऱ्हाणेसुद्धा घालण्यात आले. टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात रविवारी दिवसभर सायकल संमेलन उत्साहात झाले.
संमेलनाची पालखी उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनीसुद्धा नाचवण्याचा आनंद घेतला. अण्णा सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर ते म्हणाले की, आपल्या आयुष्यातला सेकंद वाया गेला तर तो परत मिळत नाही. आपण कोणतेही कार्य करताना मुहूर्त बघतो. त्यामुळे वक्तशीरपणा हवाच. आजचे हे संमेलन खूपच कौतुकास्पद आहे. फक्त अभ्यासाकडे लक्ष न देता पालकांनीही मुलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहन द्यावे.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, दापोली, चिपळूण आणि खेड सायकलिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केले होते. संमेलनात सुमारे दोनशेहून अधिक सायकलप्रेमी, सायकलपटू, नागरिक सहभागी झाले. उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर दर्शन जाधव, तृणाल येरूणकर, मिलिंद खानविलकर, डॉ. स्वप्नील दाभोळकर आणि प्रीतम पाटणे उपस्थित होते.
-------------
चौकट १
लांजा, राजापुरातही क्लब करा
महाराष्ट्र गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांनी रत्नागिरी हा सायकल जिल्हा होण्याचे गतवर्षीच्या संमेलनात सांगितले होते. आजच्या संमेलनात त्यांनी सांगितले की, शालेय सायकलिंग स्पर्धा होणार नव्हती पण ती झाली, त्याकरिता, आपल्या जिल्ह्यातील सायकल क्लबनी पुढाकार घेतला ही चांगली गोष्ट आहे. जिल्ह्यात सायकलिंग कसे वाढेल याकडे लक्ष देऊया. खेड, चिपळूण, दापेली, रत्नागिरीत क्लब आहेत आता लांजा, संगमेश्वर, राजापूर येथेही क्लब स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा. कोकणात सायकलिंग कॅपिटल व्हावी. संमेलनाला येताना सर्वांनी सायकलवरून यावे. म्हणजे प्रशासनाला चांगले रस्ते केले पाहिजेत हे लक्षात येईल. या वर्षात प्रत्येकाने स्वतःसोबत एक तरी सायकलिस्ट घडवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.