आधुनिक तंत्रज्ञानातून विकास साधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिक तंत्रज्ञानातून विकास साधा
आधुनिक तंत्रज्ञानातून विकास साधा

आधुनिक तंत्रज्ञानातून विकास साधा

sakal_logo
By

74103
सावंतवाडी : शेतकरी बागायतदार मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना राणीसाहेब शुभदादेवी भोसले. शेजारी डॉ. संजय सावंत, डॉ. बाळासाहेब सावंत, मनीष दळवी. डॉ. प्रमोद सावंत, वनिता मेस्त्री, प्रा. दिलीप गोडकर, प्राचार्य प्रतापराव देसाई आदी.

आधुनिक तंत्रज्ञानातून विकास साधा

कुलगुरू संजय सावंत ः तळवडेत शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आर्थिक व सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय सावंत यांनी केले. तळवडे (ता.सावंतवाडी) येथे आयोजित शेतकरी बागायतदार मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्‍घाटन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू सावंत बोलत होते.
व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कोकण कृषी विद्यापीठ संचालक प्रमोद सावंत, तळवडे शिक्षण मंडळाचे बाळा पेडणेकर, सरपंच तळवडे विनिता मेस्त्री, उपसरपंच प्राजक्ता गावडे, प्राचार्य डी. एस. भारमल, एम. बी. कुलकर्णी, कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे, सहयोग ग्रामविकास मंडळ माजगावचे अध्यक्ष दिलीप गोडकर, सचिव मोतिराम टोपले, खजिनदार हनुमंत देसाई, तळवडे श्री जनता विद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव देसाई आदींसह जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, रवींद्र परब, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नेमळे कौल कारखाना अध्यक्ष राऊळ, बाळा जाधव, राजाराम गावडे, बंड्या परब, कुंदा पै, दादा परब, विजय नाईक आदी उपस्थित होते.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात शेतकऱ्यांना माती परीक्षण व त्याचे महत्त्व, शेतातील आधुनिक तंत्रज्ञान व खत व्यवस्थापन, कोकणातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेतीचे विविध पर्याय, कोकणातील शेळी पालन व्यवसाय संधी, आंबा व काजू पीक संरक्षण, शेती व फळ बागायती संदर्भात शासनाच्या योजना व सवलती, शेती करताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या औषधांचा वापर करावा, यासंदर्भात डॉ. नितीन सावंत, यशवंत गव्हाणे, सुमित भोसले, डॉ. विजयकुमार देसाई यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तळवडे येथील श्री जनता विद्यालयात प्रथमच सहयोग ग्रामविकास मंडळ गरड-माजगाव व तळवडे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने हा शेतकरी बागायतदार मेळावा आयोजित केला होता. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. तळवडे पंचकोशी व सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचाही विशेष सत्कार झाला.
---
जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव आर्थिक सहकार्य केले जाईल. बॅंक शेतीपूरक व्यवसायाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध व्यवसायात अव्वल ठरण्यासाठी प्रयत्न आहेत, असे सांगत जिल्हा बँकेमार्फत नवनवीन उपक्रम राबविले जातात. यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले.