रत्नागिरी-गुडघा प्रत्यारोपणाच्या 5 शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गुडघा प्रत्यारोपणाच्या 5 शस्त्रक्रिया
रत्नागिरी-गुडघा प्रत्यारोपणाच्या 5 शस्त्रक्रिया

रत्नागिरी-गुडघा प्रत्यारोपणाच्या 5 शस्त्रक्रिया

sakal_logo
By

गुडघा प्रत्यारोपणाच्या
एकाच दिवशी ५ शस्त्रक्रिया
रत्नागिरीत उपक्रम; डॉ. मिलिंद पटवर्धन यांचे साफल्य रुग्णालय
रत्नागिरी, ता. ८ ः शहरातील डॉ. मिलिंद पटवर्धन यांच्या साफल्य रुग्णालयात एकाच दिवशी ५ गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया ठाण्याचे डॉ. मिलिंद पाटील, डॉ. मिलिंद पटवर्धन, डॉ. प्रमोद सुर्यवंशी, डॉ. निखिल मुळ्ये यांनी केल्या आहेत.
साठीनंतर अनेकांना गुडघे दुखीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र अनेक वेळा रुग्ण आजार अंगावर काढतात. त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी अधिकच वाढत जातो. गुडघे दुखीवर उपचार करताना अनेक रुग्णांचे गुडघे प्रत्यारोपण करणे हा एकमेव पर्याय असतो.
रत्नागिरीतील डॉ. मिलिंद पटवर्धन यांनी गुडघे प्रत्यारोपणसाठी आवश्यक असलेल्या सुविधांनीयुक्त शस्त्रक्रियागृह तयार केले आहे. ठाणे येथील ज्येष्ठ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. पाटील यांनी साफल्य हॉस्पिटलमध्ये येवून गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी त्यांनी एकाच दिवशी तब्बल पाच गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. या प्रकारचा यशस्वी प्रयोग रत्नागिरीत प्रथम करण्यात आला आहे. डॉ. पाटील यांनी आतापर्यंत साफल्य रुग्णालयात तब्बल १५० हून अधिक शस्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता रत्नागिरीकरांना होणार आहेच. मात्र अशा सुविधा येथे उपलब्ध झाल्यामुळे रत्नागिरीच्या आरोग्य सेवेत एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.

चौकट
खर्चात बचत
मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कराव्या लागणाऱ्या खर्चापेक्षा ६० टक्के कमी खर्चात या शस्त्रक्रिया होत असल्याने त्याचा फायदा रत्नागिरीतील व पंचक्रोशीतील रुग्णांना होत आहे. परदेशी जॉइंट वापरुन या गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तर शस्रत्रक्रिया केल्यापासून दुसऱ्या दिवसापासून रुग्ण चालू शकतो, हे यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.