लांजा-लांजात काव्यानंदातून रसिक मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांजात काव्यानंदातून रसिक मंत्रमुग्ध
लांजा-लांजात काव्यानंदातून रसिक मंत्रमुग्ध

लांजा-लांजात काव्यानंदातून रसिक मंत्रमुग्ध

sakal_logo
By

-rat8p27.jpg- KOP23L74117लांजा ः कविता सादर करताना मराठी साहित्य परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष साहित्यिक कवी अॕड. विलास कुवळेकर.
-------------

लांजात काव्यानंदातून रसिक मंत्रमुग्ध
लांजा, ता. ८ ः ज्याला निसर्गाच्या भावनांशी एकरूप होता येते आणि त्या भावनांना शब्द देता येतात तोच कवी म्हणून रसिकांच्या मनात उतरतो. याची प्रचिती ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकूरकर, वैभव दळवी आणि अॕड. विलास कुवळेकर यांनी चौरंगी कवितेतून काव्यानंद देत मंत्रमुग्ध केले.
लोकमान्य वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेतर्फे बहारदार चौरंगी काव्य मैफलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी अशोक बागवे यांच्या हस्ते झाले. वाचनालयाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे व कार्यवाह उमेश केसरकर यांनी स्वागत केले. नासा व इस्त्रो या दोन्ही संस्थांना भेट देण्यासाठी झालेल्या निवड चाळणीत लांजा तालुक्यात अव्वल मानकरी ठरलेला शिरवलीचा आशिष अनिल गोबरे, इस्त्रो भेटी निवड झालेल्या वनगुळे नं. 1 चा आर्यन संजय गुरव आणि लांजा क्र. 5 ची वेदिका सिद्धार्थ वारंगे, भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिक अणुऊर्जा विभागात वैज्ञानिक अधिकारीपदी निवड झालेले बासीतअली सादिक नेवरेकर व अमेरिकेत उच्चशिक्षण घेत असलेली मृणाल रेडीज यांचा कवींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कविता वाचन झाले.