मंडणगड-ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड-ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करा
मंडणगड-ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करा

मंडणगड-ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat8p29.jpg-KOP23L74126 मंडणगड ः स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलताना शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे.
--------

ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करा

शौर्यचक्र विजेते मधुसुदन सुर्वे ; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

मंडणगड, ता. ८ ः विद्यार्थीदशेत ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. सनदी सेवेमध्ये अधिकारी होण्याबरोबरच आर्मी, पोलिस, नेव्ही, एअरफोर्स आदी अनेक क्षेत्रात विद्यार्थी करियर घडवू शकतात. बदलत्या काळात मोबाईल संस्कृतीचा अंगीकार करण्यापेक्षा वीरांच्या गाथांपासून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची आवश्यकता आहे, असे मत भारतीय सैन्य दलातील शौर्यचक्र विजेते निवृत्त पॅराकमांडर मधुसूदन सुर्वे यांनी व्यक्त केले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संवेदना फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. निवृत्त सुभेदार सतीश सुर्वे, लेप्टनंट कर्नल संतोष मोरे, माजी पोलिस आयुक्त रमेश घडवले, संवेदना फाऊंडशनचे अध्यक्ष विनोद चाळके, विश्वास पवार, पोलिस निरीक्षक शैलजा सावंत, नायब तहसीलदार संजय भिसे, शुभोधन जाधव आदी उपस्थित होते.
मधुसूदन सुर्वे म्हणाले, ‘देशातील सैनिकांच्या शौर्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात असण्याची आवश्यकता आहे. करियर निवडताना आपल्या काय करावयाचे आहे, हे ठरविण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. त्यामुळे मोठा विचार करा, उच्च ध्येयपुर्तीसाठी माणूस प्रेरीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी खऱ्या ज्ञानाची कास धरा.’
लेप्टनंट कर्नल संतोष मोरे म्हणाले, ‘जीवनात कोणत्याही क्षेत्रात वावरताना माणासमध्ये सकारात्मकता असणे गरजेचे आहे. ’