रत्नागिरी- एक तरी नवा सायकलस्वार घडवू

रत्नागिरी- एक तरी नवा सायकलस्वार घडवू

Published on

फोटो ओळी
-rat८p२५.jpg-KOP२३L७४०८१ रत्नागिरी : येथे रविवारी सायकल गौरव पुरस्कार विनायक वैद्य यांना प्रदान करताना रवींद्र सामंत आणि धनंजय मदन. डावीकडून धीरज पाटकर, प्रसाद देवस्थळी आणि सौ. वैद्य.

एक तरी नवा सायकलस्वार घडवू या!

विनायक वैद्य ; सायकल गौरव पुरस्कार प्रदान
रत्नागिरी, ता. ८ : सायकल गौरव पुरस्कारामुळे खूप आनंद झालाय. महागातल्या महाग गाडी घेतली असती तर जेवढा श्रीमंत वाटलो नसतो तेवढा सायकलच्या छंदातून श्रीमंत झालो आहे. १० वर्षांचा प्रवास आहे. हा छंद आहे. दिसेल त्या माणसांना सायकलवर बसवू शकलो. त्यांची माहिती इतरांना देत गेलो. मी स्पर्धात्मक सायकलिंग करत नाही. माझे कौतुक केले आहे, बोलायला शब्द नाहीत. या वर्षभरात नवा सायकलस्वार घडवू, असे सर्वांनी ठरवूया, असे प्रतिपादन भटक्या खेडवाला अर्थात सायकलस्वार विनायक वैद्य यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनात पहिला सायकल गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर ते बोलत होते. टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात आज सायकल संमेलनात खेड येथील विनायक वैद्य यांना ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत आणि महाराष्ट्र गिर्यारोहक संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय मदन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी कार्यक्रमात व्यासपीठावर सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी आणि नंदाई डिजिटल मार्केटिंगचे धीरज पाटकर व सौ. वैद्य उपस्थित होते. श्री. वैद्य यांना दिलेल्या सन्मानपत्राचे काव्यमय लेखन देवगड येथील सुप्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांनी केले. त्यांनी त्याचे स्वतः सुरेलमय वाचन केले.
श्री. वैद्य यांनी गेली अनेक वर्षे ट्रेकिंग, सायकलिंग केले आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीशी जुळवून घेणारे, सायकल गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. भटक्या खेडवाला या नावाने ते लिखाण करतात. सायकलिंगविषयीचे अनुभव मांडतात आणि दिसेल त्याला सायकलवर बसवतात. खेड सायकलिंग क्लब स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून पहिले सायकल संमेलन गतवर्षी खेडमध्ये आयोजित करण्यात मोठे योगदान दिले. त्यानंतरच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब स्थापन झाला व दुसरे संमेलन भरवण्याचा मान यंदा रत्नागिरीला मिळाला. वैद्य यांच्या सायकलिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल पहिला सायकल गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com