रत्नागिरी- आज सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- आज सत्कार
रत्नागिरी- आज सत्कार

रत्नागिरी- आज सत्कार

sakal_logo
By

पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष
अॅड. पटवर्धन यांचा आज सत्कार
रत्नागिरी, ता. ८ : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अॅड. दीपक पटवर्धन यांचा सोमवारी (ता. ९) सत्कार करण्यात येणार आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राज्य पतसंस्था फेडरेशन गेली २६ वर्षे महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे. पाच वर्षे राज्य पतसंस्था फेडरेशनवर तज्ज्ञ संचालक म्हणून अॅड. पटवर्धन कार्यरत आहेत. फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली. त्या वेळी अॅड. पटवर्धन यांचीही बिनविरोध निवड झाली. आज पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळी अॅड. पटवर्धन यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. सत्कार समारंभाला सहकार क्षेत्रातील आणि पतसंस्था क्षेत्राशी निगडीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, द. रत्नागिरी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू, रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले आहे.