हिर्लोक, वेताळबांबर्डेत शेतीला हातेरी धरणातून पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिर्लोक, वेताळबांबर्डेत शेतीला हातेरी धरणातून पाणीपुरवठा
हिर्लोक, वेताळबांबर्डेत शेतीला हातेरी धरणातून पाणीपुरवठा

हिर्लोक, वेताळबांबर्डेत शेतीला हातेरी धरणातून पाणीपुरवठा

sakal_logo
By

swt९९.jpg
७४२२७
हातेरीः आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हातेरी धरणातून हिर्लोक, वेताळबांबर्डे गावांमधील शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू झाला.

हिर्लोक, वेताळबांबर्डेत शेतीला
हातेरी धरणातून पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हातेरी धरणातून हिर्लोक, वेताळबांबर्डे गावांमधील शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यातून जलसंपदा विभागामार्फत हिर्लोक गावातील हातेरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणारी एक कि. मी. पाण्याची लाईन सुरू केली आहे. त्यामुळे हिर्लोक, वेताळबांबर्डे या गावांमधील शेतीसाठी पाणीपुरवठा होणार असून १८ हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ग्रामस्थांनी पाण्याचा प्रवाह वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार नाईक यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्याशी चर्चा करून पाण्याचा प्रवाह वाढविण्यास सांगितले.
श्रीमंगले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून इंजिनिअरकडून पाण्याचा प्रवाह वाढवून दिला. हातेरी धरणातून ६.५ कि.मी. लाईनचे काम देखील प्रस्तावित असून यामुळे ६० हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात १ कि.मी. पाण्याची लाईन सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमंगले, जलसंपदा विभागाचे जोशी, वेताळ बांबर्डे ग्राणपंचायत सदस्य शैलेश घाटकर, संतोष कदम, दीपक कदम, जयराम कदम उपस्थित होते.