
डॉ. चंद्रकांत सावंत यांचा मुंबईत पुरस्काराने गौरव
swt९२.jpg
७४२२०
मुंबईः डॉ. चंद्रकांत सावंत यांना पुरस्कार प्रदान करताना जयंत ओक, दीप्ती भागवत, अन्यूल अत्तार, डॉ. अमजद खान पठाण, स्नेहलता राऊत, श्रीराम राऊत आदी.
डॉ. चंद्रकांत सावंत यांचा
मुंबईत पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ९ः ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा मठ प्राथमिक शाळा नं. २ चे पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल मुंबई येथील ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने घेत त्यांना ग्लोबल गोल्ड स्टार अवॉर्ड २०२२ पुरस्काराने सन्मानित केले. डॉ सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा ७० शाळांमधील ९५ आणि ५ हायस्कूलमधील २५ विद्यार्थिनी मिळून एकूण ७५ शाळांमधील १२० विद्यार्थिनी दत्तक घेत ३ लाख ७७ हजार रुपये कायमस्वरुपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी या मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे.
पैशांअभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयांचे कर्ज सावंत यांनी स्वतः भरून या महिलांना कर्जमुक्त केले. त्यामुळे समाज हितासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. मुंबई प्रभादेवी येथे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे पुरस्कार वितरण सोहळ्याला अभिनेते जयंत ओक, अभिनेत्री दीप्ती भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अन्यूल अत्तार, शास्त्रज्ञ डॉ. अमजद खान पठाण, श्रीराम महाजन, संजय महादेव राऊत, स्नेहलता संजय राऊत, दत्ता खंदारे आदी उपस्थित होते.