
बॉस्कोरी कॅम्पमध्ये ''डॉन बॉस्को''ची चमक
swt९३.jpg
74221
सिंधुदुर्गनगरीः ‘डॉन बॉस्को’च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे येथील रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.
गुवाहटीत ‘डॉन बॉस्को’ची चमक
राष्ट्रीय स्पर्धेत यशः विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्गनगरीत जंगी स्वागत
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ः गुवाहटी येथील राष्ट्रीय बॉस्कोरी कॅम्पमध्ये ओरोस डॉन बॉस्कोच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत झाले.
सिंधुदुर्गनगरी डॉन बॉस्को आणि ज्युनियर कॉलेजचे २९ विद्यार्थी गुवाहाटी येथे २९ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान आसाम-गुवाहाटी येथे झालेल्या १४ व्या राष्ट्रीय बॉस्कोरी नॅशनल कॅम्प येथे सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या १३ स्पर्धांत ७ स्पर्धांत प्रथम, तर एका स्पर्धेत चाम्पियनशिप संपादन केली. तंजावर, नाशिकनंतर आसाम-गुवाहाटी येथे गेलेल्या या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आगमन होताच स्वागत करण्यात आले. यात १३ स्काऊट आणि १५ गाईडस् सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर या विद्यार्थ्यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी फादर शावियो गोम्स, फादर कारडोज, हरेश वाघाटे, शरील पिंटो, नताशा फर्नांडीस, स्काऊट मास्तर मिलिंद लब्दे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. गुवाहाटी येथे सिंधुदुर्ग डॉनबॉस्कोने मिळविलेल्या यशामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांचाही मोठा वाटा आहे, असे यावेळी फादर गोम्स यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचे ढोल-ताश्यांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डॉन बॉस्को हायस्कूलमधील वेदवंती बांदेकर हिने आसाम-गुवाहाटी येथे १४ व्या राष्ट्रीय बॉस्कोरचा आपला अनुभव व्यक्त करताना आम्ही २९ डिसेंबरला पोहोचलो. हे शिबिर सहा दिवसांचे होते. एकूण १४ उपशिबिरे होती. त्यामध्ये एकूण ७ शिल्ड आम्हाला मिळाली. आम्ही आमच्या उपशिबिरात १२ व्या आणि १३ व्या नॅशनल बॉस्कोरीमध्ये पहिल्या स्थानावर राहिलो. सर्वांनी राष्ट्रीय बॉस्कोरसाठी एक वर्ष आधी तयारी केली होती; मात्र आम्ही केवळ २० दिवस सराव केला होता. तरीही चांगले यश मिळाले. हा आमच्यासाठी चांगला अनुभव होता. आपली संस्कृती महान आहे. शिक्षक आणि वडिलांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आम्ही पहिले आलो. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर ढोल पथक आणि लेझीमसह पालक आणि मुख्याध्यापक, शिक्षकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत अविस्मरणीय असून हा अनुभव कधीही विसरणार नाही, असे सांगितले.