
नव्या जिद्दीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते
rat०९२४.txt
(टुडे पान ३ साठी)
फोटो ओळी
-rat९p१८.jpg-
७४२३५
कोसुंब (ता. संगमेश्वर) ः कोसुंब येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करताना समर्थ क्षीरसागर.
---
जिद्दीने प्रयत्न केल्यास मिळते यश
समर्थ क्षीरसागर ; संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
संगमेश्वर, ता. ९ ः शालेयस्तरावर पाचवी-सहावीत आपण विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता; मात्र नंबर आला नाही. त्या वेळी मन निराश झाले होते; मात्र जिद्दीने सातवीत असताना परत भाग घेतला आणि शेतीसाठी फवारणी यंत्राचे मॉडेल तयार केले आणि आमच्या मॉडेलला पारितोषिक मिळाले. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर निराश न होता नव्या जिद्दीने प्रयत्न करा आणि नवी स्वप्ने उराशी बाळगा, असे आवाहन परिविक्षाधीन तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी केले.
कोसुंब येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात संगमेश्वर तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन व मेळाव्याचे उद्घाटन समर्थ क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थाध्यक्ष नामदेव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, संचालक शैलेश जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवणे, मुख्याध्यापक प्रशांत राऊत, विज्ञान मंडळ तालुक्याचे कौस्तुभ जोशी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील म्हणाले, या प्रदर्शनाचा वैज्ञानिक खेळणी हा विषय आहे. आपण येथे मांडलेली मॉडेल समजून घेऊन त्याचा आनंद घ्या. विज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी व्हावा हा संदेश आज आपण येथून घेऊन जाऊया, असे आवाहन पाटील यांनी केले.
७२ मॉडेलची मांडणी
प्रश्नमंजुषामध्ये तालुक्यातील ३२ शाळांनी भाग घेतला असून सहावी ते आठवीची एकूण ३५ मॉडेल आणि नववी ते बारावीची एकूण ३७ मॉडेल या प्रदर्शनात मांडण्यात आली असून, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची १३ मॉडेल तर प्रयोगशाळा परिचरांची ४ मॉडेल मांडण्यात आली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली. प्रवीण लिंगायत यांनी लिहिलेल्या स्पर्धा परीक्षा तंत्र आणि मंत्र विषय गणित या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
--