माडबनमध्ये रंगले वस्त्रहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माडबनमध्ये रंगले वस्त्रहरण
माडबनमध्ये रंगले वस्त्रहरण

माडबनमध्ये रंगले वस्त्रहरण

sakal_logo
By

rat०९२८.txt

(टुडे पान २ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat९p२१.jpg-
७४२४१
माडबन (ता. राजापूर) ः वस्त्रहरण नाटकातील एक क्षण.
--
माडबनमध्ये रंगले वस्त्रहरण

शाळेचा शताब्दी महोत्सव ; गिरीश ओक यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. ९ ः ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे जगप्रसिद्ध विश्वविक्रमी मालवणी नाटक वस्त्रहरण गावातील स्थानिक तरुण-तरुणींना घेऊन स्वतः लेखक गवाणकर यांनी एकच महिन्याच्या तालमीनंतर सादर केलेल्या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.
तालुक्यातील माडबन प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने याच शाळेत १९५२ ला शिकलेले ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या विठ्ठल विठ्ठल आणि वस्त्रहरण या नाटकाचे प्रयोग ठेवण्यात आले होते. या नाटकांना माडबन आणि परिसरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रख्यात अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि मुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अजिंक्य चौलकर स्ट्राँगेस्ट वुमेन ऑफ एशिया अनुजा तेंडोलकर यांची या कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या शाळेचा शताब्दी महोत्सव भव्यदिव्य होण्यासाठी मुंबई आणि ग्रामीण अशा दोन कमिट्या तयार करण्यात आल्या होत्या. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी यासाठी मेहनत घेत शताब्दी महोत्सव यशस्वी केला. डॉ. ओक यांची उपस्थिती आणि गंगाराम गवाणकर यांच्या वस्त्रहरण या नाटकाचा स्थानिक लोकांना घेऊन केलेल्या नाट्यप्रयोगाने शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची उंची वाढवली. स्वतः गवाणकर यांनी आपल्याच गावातील सर्व युवक-युवतींना एकत्र करून वस्त्रहरण या नाटकाचा प्रयोग करण्याचे निश्चित केल्यानंतर युवक-युवतींनीही त्यांना भरभरून प्रतिसाद देत केवळ एक महिन्याच्या तालमीनंतर अतिशय सुंदर नाट्यप्रयोग सादर केला. ८३ वर्षाचे गंगाराम गवाणकर यांनी (कै.) मच्छिंद्र कांबळी यांनी अजरामर केलेली तात्या सरपंचाची भूमिका साकारली, तर प्रसाद पंगेरकर यांनी जोशी मास्तर यांची भूमिका साकारली. संगीता राजविलकर यांनी साकारलेली द्रौपदी काकूची भूमिका आणि प्राची राघव यांनी मंजुळाबाई यांची भूमिका साकारून आम्हीही काही कमी नाहीत हे दाखवून दिले. अर्जुनाच्या भूमिकेत धनंजय गवाणकर तर दुर्योधनाच्या भूमिकेत नितेश गवाणकर यांनी धमाल उडवून दिली. विदुराची भूमिका साकारलेले सागर मांजरेकर यांनी गायनाने नाट्यप्रयोगात रंग भरले.