सेवा सुरळीत ठेवा, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा सुरळीत ठेवा, अन्यथा आंदोलन
सेवा सुरळीत ठेवा, अन्यथा आंदोलन

सेवा सुरळीत ठेवा, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

74257
सावंतवाडी : बीएसएनएलचे जिल्हा महाव्यवस्थापक जानू यांच्याशी चर्चा करताना मनसे पदाधिकारी.

सेवा सुरळीत ठेवा, अन्यथा आंदोलन

मनसेचा इशारा; सावंतवाडीत बीएसएनलचे अधिकारी धारेवर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः इंटरनेट आणि नेटवर्क समस्येमुळे तालुक्यात गावागावांत मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे इंटरनेट व नेटवर्क सुरळीत ठेवा; अन्यथा ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करू, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे जिल्हा महाव्यवस्थापक रविकिरण जानू यांना दिला.
तालुक्यातील विविध प्रश्नांवरून आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील बीएसएनएल कार्यालयावर धडक देत जिल्हा महाव्यवस्थापक जानू यांची भेट घेतली. यावेळी आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याबाबत जाब विचारला. उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे जानू यांनी सांगितले. दुसरीकडे गावातील इंटरनेट संदर्भातही अनेक समस्या असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. इंटरनेट व रेंज सुरळीत ठेवा; अन्यथा गावातील लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, माजी संपर्क अध्यक्ष महेश परब, कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, बाळा बहिरे, मिलिंद सावंत, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.
--
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
सद्यस्थितीत इंटरनेट हा मुलांचा शैक्षणिक भाग बनला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बीएसएनएलचे नेटवर्क व इंटरनेट विद्यार्थी वापरत असल्याने वारंवार होणाऱ्या बिघाडाचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. एकूणच यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून हे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली.