
मार्गदर्शन केल्यास भवितव्य उज्वल
swt921.jpg
74276
निरवडेः येथील संस्कार नॅशनल स्कूल येथे अभिलाष अवस्थी यांचा सत्कार करताना चंद्रशेखर जैन.
मार्गदर्शन केल्यास भवितव्य उज्वल
अभिलाष अवस्थीः निरवडेत नॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः पालकांनी पाल्यावर योग्य संस्कार व योग्य मार्गदर्शन केल्यास मुलाचे भवितव्य उज्वल होऊ शकते. शिक्षणातील विविध संधी त्यांना प्राप्त होऊ शकतात. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध उपक्रमात मुलांचा सहभाग दाखवून त्यांचा सर्वांगण विकास साधण्यासाठी पालकांनी पुढे यावे, असे मत हिंदी साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभिलाष अवस्थी यांनी निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदूर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, मुंबईचे पत्रकार अनंत मेस्त्री, जव्हार राठोड, दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जैन, निलेश जैन, निरवडे सरपंच शिवानी गावडे, न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊस्कर, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, निरवडे माजी सरपंच हरी वारंग, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष अशोक घोगळे, सहसचिव नेहा भिसे, मॅनेजमेंट सदस्य जया भारती मदनेनी, मुख्याध्यापक गजानन पालेकर, विष्णू परब, राजन कालवणकर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी शेख यांनी मुलांना यावेळी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. मुलांनी स्पर्धात्मक उपक्रम सहभाग घेऊन आपल्या सर्वांगीण विकास साधावा, असे मत यावेळी व्यक्त केले. निरवडे येथील ग्रामीण भागातील संस्कार नॅशनल स्कूल हे आधुनिक दर्जाचे स्कूल असून या ठिकाणी दर्जात्मक शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी पालकांनी आपल्याला योग्य ते सहकार्य करावे व मार्गदर्शक करून येथील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक उपक्रम कसे राबवता येतील, याकरिता आपणास सहकार्य करावे, असे मत दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जैन यांनी केले.
यावेळी संस्कार नॅशनल स्कूलमधील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धात्मक उपक्रमात प्राविण्य बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन काका सावंत व शुभम धुरी यांनी केले.