मान्यता प्राप्त ग्रंथालयांचे विद्यार्थ्यांना वर्गणीदार करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मान्यता प्राप्त ग्रंथालयांचे 
विद्यार्थ्यांना वर्गणीदार करा
मान्यता प्राप्त ग्रंथालयांचे विद्यार्थ्यांना वर्गणीदार करा

मान्यता प्राप्त ग्रंथालयांचे विद्यार्थ्यांना वर्गणीदार करा

sakal_logo
By

मान्यताप्राप्त ग्रंथालयांचे
विद्यार्थ्यांना वर्गणीदार करा
शिक्षण आयुक्तालय; शिक्षण विभागास सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ९ ः शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शासन मान्यता प्राप्त ग्रंथालयांचे वर्गणीदार करण्याचे आवाहन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षण विभागाला केले आहे. ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत राज्यामध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या ग्रंथालयांना मान्यता देऊन त्यांच्या वर्गवारीनुसार शासन ग्रंथ खरेदीसाठी अनुदान देखील देते; परंतु ग्रंथालयाचा वापर शालेय विद्यार्थ्यांकडून पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. या मान्यता प्राप्त ग्रंथालयाची वर्गणी नाममात्र असते. अशा ग्रंथालयाचे वर्गणीदार होण्यासाठी सर्वसाधारणपणे सहावी व त्यानंतरच्या विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे. ग्रंथालयाचे वर्गणीदार केल्यास शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी मार्गदर्शक ठरेल, असा हेतू आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्याचे सहाय्यक संचालक यांच्याकडून यादी घेऊन त्यानुसार कोणती शाळा कोणत्या ग्रंथालयास ज़ोडली आहे व त्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थी वर्गणीदार केल्याची माहिती प्राप्त करून घ्यावी. जिल्ह्याचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. याकामी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी विभाग समन्वय अधिकारी म्हणून काम पहावे. क्षेत्रीय अधिकारी म्हणून यावर संनियंत्रण करून वेळोवेळी आढावा घ्यावा, असे शासन आदेश आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग, सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण) यांना केले आहेत.