मुक्तांगण महिला मंच अध्यक्षपदी बांदेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्तांगण महिला मंच अध्यक्षपदी बांदेकर
मुक्तांगण महिला मंच अध्यक्षपदी बांदेकर

मुक्तांगण महिला मंच अध्यक्षपदी बांदेकर

sakal_logo
By

74299
स्वाती बांदेकर, साक्षी वेंगुर्लेकर

मुक्तांगण महिला मंच अध्यक्षपदी बांदेकर
वेंगुर्ले ः येथील मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी स्वाती बांदेकर, तर कार्याध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर यांची बिनविरोध निवड झाली. मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष माहेश्वरी गवंडे, खजिनदार रुपा शिरसाट, सचिव मंजिरी केळजी, सांस्कृतिक विभागप्रमुख संजना तेंडोलकर, उपक्रम विभागप्रमुख दिव्या आजगांवकर, सहल विभागप्रमुख संध्या करंगुटकर, सभासदत्व विभाग प्रमुख रिया केरकर व हेमा मठकर यांचा समावेश आहे. दिव्या आजगावकर यांनी वर्षभरातील कामकाज आणि उपक्रमांचा आढावा घेतला. महिलांमध्ये सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास विकसित होण्यासाठी संघटन महत्त्वाचे असल्याचे परुळेकर यांनी सांगत महिलामंचातर्फे संस्थाभेटी, कार्यशाळा, व्याख्याने व उपक्रम राबविले जातील अशी माहिती दिली. सावित्रीबाईंच्या ओवीने बैठकीचा समारोप झाला.