क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा महोत्सव
क्रीडा महोत्सव

क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

rat०९२१. txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

कोतवडे शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव

रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे येथील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कोमल देवकर यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे कार्यवाह अरविंद कोतवडेकर तसेच उपाध्यक्ष संजय मयेकर, सहकार्यवाह नरेश कांबळे व सरपंच संतोष बारगोडे आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिवपुजे यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडास्पर्धा झाल्यानंतर दोनच दिवसांनी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा झाला. या वेळी शशिकांत पटवर्धन, संस्थेचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, उपाध्यक्ष संजय मयेकर उपस्थित होते. संस्थेतर्फे गावातील वाडीप्रमुख व परिसरातील सरपंचांचा तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पोषण आहार बनविणाऱ्या रेखा पांचाळ यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
---

खंडाळ्यात रविवारी वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी ः लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त १७ जानेवारीला बहुजन समाजासाठी त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय योगदानावर भाष्य करून त्यांना आदरांजली वाहण्याकरिता वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा रविवारी (ता. १५) जानेवारी सकाळी १० वाजता वाटद-खंडाळा येथील हॉटेल स्वप्नपूर्ती येथे होणार आहे. बालगट (पहिली ते चौथी) विषय - लोकनेते ः शामरावजी पेजे वेळ, प्राथमिक गट (पाचवी ते सातवी)- विषय ः बहुगुणी व्यक्तिमत्व ः शामरावजी पेजे, शालेय गट (आठवी ते दहावी)- शामरावजी पेजे, महाविद्यालयीन गट (अकरावी ते पंधरावी)- शामराव पेजे आज असते तर, खुला गटासाठी शामरावजी पेजे ः चिंतन हा विषय आहे. अधिक माहितीसाठी साडेबावीस खेडी कुणबी संघटना, वाटद खंडाळा पंचक्रोशी व नंदकुमार बेंद्रे, सुजित दुर्गवळी, नामदेव चौगुले, अरुण मोर्ये यांच्याशी संपर्क साधावा.
--

फोटो ओळी
- ratchl९६.jpg ः
७४३०९
चिपळूण ः यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आमदार शेखर निकम.
--
शिष्यवृत्ती परीक्षेत सती विद्यालयाचे यश

चिपळूण ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाने यश मिळवले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १० अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शासकीय शिष्यवृत्ती मिळवली आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २८ विद्यार्थी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत २१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना पाचवीसाठी स्मिता भालेकर, स्नेहलता वरेकर, छाया कारंडे, समीर पिलवलकर, दीपक भुवड, स्नेहल भोसले, आठवीसाठी आनंद भुवड, शर्मिला म्हादे, योगेश नाचणकर, सतीश पालकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.