नाट्य महोत्सवास बांद्यात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य महोत्सवास बांद्यात प्रतिसाद
नाट्य महोत्सवास बांद्यात प्रतिसाद

नाट्य महोत्सवास बांद्यात प्रतिसाद

sakal_logo
By

74329
रोणापाल ः माऊली मंदिरात लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम सोहळ्यास भाविकांची झालेली गर्दी.

बांद्यात नाट्य महोत्सवास प्रतिसाद
बांदा ः रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ व श्री देवी माऊली देवस्थान समिती आयोजित मंदिरात ४ ते ८ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय दशावतारी नाट्य महोत्सव उत्साहात झाला. यानिमित्ताने मंदिरात आयोजित लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम सोहळ्याला पंचक्रोशीसह चाकरमानी मोठ्या संख्यने उपस्थित होते. नाट्य महोत्सवात जय हनुमान दशावतार मंडळ, आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ व मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाट्यप्रयोग झाले. काल (ता. ८) लघुरुद्र, संग्रह, दुर्गाहोम व शुद्धीकरण कार्यक्रम, महाआरती, महाप्रसाद, संचारित देवतांचा आशीर्वाद व सवाद्य देवता भ्रमण हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्री देवी माऊली उत्सव मंडळातर्फे सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते.
...............
74330
नील बांदेकर

नील बांदेकरचे स्पर्धांमध्ये यश
बांदा ः येथील केंद्रशाळा नंबर १ चा चौथीचा विद्यार्थी नील बांदेकर याने २०२२ वर्षात अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसे पटकावली. यात दोडामार्ग येथे राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा, फ्लोरिडा-अमेरिका आयोजित चित्रकला स्पर्धा या स्पर्धांत तो अव्वल ठरला. विभागस्तर ‘ज्ञानी मी होणार’ या स्पर्धेत केंद्र आणि बीटमध्ये साहिल कोळापटे याच्यासह प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तालुकास्तरावर ‘ज्ञानी मी होणार’मध्ये द्वितीय क्रमांकाचा शिलेदार ठरला. ‘डॉट कॉम’ आयोजित वाचन स्पर्धेतही तो राज्यात प्रथम आला. नीलने आतापर्यंत कमावलेल्या बक्षिसांची संख्या सुमारे १२१ एवढी झाली आहे. चित्रकला, रंगभरण, गायन, कथाकथन, वक्तृत्व, मॉडेलिंग, निबंध, हस्ताक्षर यात त्याचा हातखंडा आहे. तबला, गिटार, कोंगो अशी वाद्ये वाजविण्यातही तरबेज आहे.