रत्नागिरी-पानवलचे 25 तरुण गेले पायी मार्लेश्वरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पानवलचे 25 तरुण गेले पायी मार्लेश्वरला
रत्नागिरी-पानवलचे 25 तरुण गेले पायी मार्लेश्वरला

रत्नागिरी-पानवलचे 25 तरुण गेले पायी मार्लेश्वरला

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat९p३३.jpg-KOP२३L७४३२० रत्नागिरी- तालुक्यातील पानवल येथील तरूणांनी मार्लेश्वरपर्यंत पायी प्रवास करत घेतले दर्शन.
---------

पानवलचे २५ तरुणांची
पायी मार्लेश्वर वारी
रत्नागिरी, ता. ९ : मार्लेश्वरावर असलेल्या अपार श्रद्धेपोटी तालुक्यातील पानवल येथील तरुण गेली २ वर्षे पानवल ते मार्लेश्वर पायी प्रवास करीत दर्शनाला जातात. यावर्षीही येथील २५ तरुण एकत्रित मार्लेश्वरच्या दर्शनाला निघाले आहेत.
पानवल येथील हे तरुण रविवारी (ता. ८) घरातून शिदोरी आणि पाणी बॉटल आवश्यक सामान घेऊन निघाले आहेत. आज सायंकाळच्या सुमारास ते मार्लेश्वरला पोहोचले. थंडी आणि उन्हाची तमा न बाळगता हे तरुण पायी प्रवास करत मार्लेश्वरला पोहचले आहेत. सावलीच्या ठिकाणी नाश्ता करण, दुपारचं जेवण आणि रात्री निवारा पाहून विश्रांती करणे, असा त्यांचा प्रवास होता. आज मार्लेश्वरला पोहोचल्यानंतर स्वयंभू मार्लेश्वरचे दर्शन घेऊन हे तरुण परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा दोन दिवस त्यांचा प्रवासात जाणार आहे.