कोतवालाची बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतवालाची बदली
कोतवालाची बदली

कोतवालाची बदली

sakal_logo
By

rat०९३५.txt

(पान ३ साठी)

कुळाच्या जमिनीत फेरफार, कोतवालाची बदली

वाटद येथील प्रकार ; शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल

रत्नागिरी, ता. ९ ः तालुक्यातील वाटद येथील कोतवालाने कुळाच्या जमिनीमध्ये परस्पर स्वतःची वहिवाट दाखवल्याप्रकरणी झालेल्या तक्रारीची गंभीर दखल तहसीलदारांनी घेतली. याबाबत त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनांमार्फत, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबतचा वाटद येथील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तक्रारीमुळे त्या कोतवालाची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. तहसीलदार जाधव यांनी हा निकाल दिला आहे.

वाटद-खंडाळा येथील कार्यालयात एक कोतवाल कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून ते पूर्वापार काळापासून या जमिनी कसत आहेत. त्यामध्ये ते भातशेती नाचणी, काजू, आंबा ही वडिलोपार्जित पारंपरिक शेती या ठिकाणी करत आहोत. वहिवाट दाखवण्याचा संबधित कोतवालांचा काहीही संबंध नसताना देखील त्यांनी येथे वहिवाट दाखवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
या तक्रारीनंतर सुनावण्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या बाजूने पहिला आदेश झाला. यामध्ये तक्रारदार यांचे म्हणणे अंशतः मंजूर देण्यात आले आहे. तसेच २००५ ला सेवेत दाखल झाल्यानंतर कुळ कायद्याने ज्या मालमत्ता प्राप्त केल्या आहेत. त्या प्राप्त करण्यापूर्वी किंवा विक्री करून घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याची दिसून येत नाही. याबाबत ''महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील १९ व ३ नुसार उल्लंघन केल्याचे दिसते. त्यानुसार यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. तसेच संबधित कोतवालाची बदली करण्यात आली आहे.