
मारहाणप्रकरणी जामीन नामंजूर
मारहाण प्रकरणी
जामीन नामंजूर
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः संगनमताने कट करून मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी नामंजूर केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. प्रेमकुमार नलवडे, शिवसागर नलवडे, ओंकार भजनावळे, कासीम हसन नदाफ (सर्व मलकापूर, ता. कऱ्हाड, जि. सातारा) या चारही संशयितांनी शिवानंद जंगम यांना २ डिसेंबर २०२२ ला रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ जानवली येथे गंभीर मारहाण करून जखमी केले होते. याबाबत जखमी शिवानंद यांचे काका सुनील रामचंद्र जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारही जणांवर व त्यांना गुन्ह्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल संजीवनी ऊर्फ सायली राणे (जानवली) यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी जामीन अर्जासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यांच्या जामीन अर्जाला अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी हरकत घेतली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी चारही जणांचा जामीन अर्ज नामंजूर केला.