Sun, Feb 5, 2023

घरफोडीप्रकरणी
दोघे ताब्यात
घरफोडीप्रकरणी दोघे ताब्यात
Published on : 9 January 2023, 2:01 am
घरफोडीप्रकरणी
दोघे ताब्यात
कुडाळ, ता. ९ ः पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे भूपकरवाडी येथील अजय वाढवे यांचे घर फोडल्याप्रकरणी दोन परप्रांतीय व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. या दोघांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चंदन मेस्त्री, धीरज यादव अशी संशयितांची नावे आहेत. वाढवे यांचे घर फोडल्याप्रकरणी या दोघांना पकडून मनसे माजी उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात आणले. यावेळी राजन माणगावकर, रोशन कटेकर, गणेश जाधव, अजय वाढवे, केतन चव्हाण आदी उपस्थित होते.