
राज्य परिवहन महामंडळातर्फे आजपासून सुरक्षा अभियान
राज्य परिवहन महामंडळातर्फे
आजपासून सुरक्षा अभियान
कणकवली,ता. १० ः राष्ट्रीय सुरक्षिता परिषदेच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे ११ ते २५ जानेवारी या कालावधीमध्ये सुरक्षितता मोहीम अभियान राबवले जाणार आहे. यावेळी आगारस्तरावर जनजागृती मोहीम केली जाणार आहे. तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा.
एसटीवरील विश्वास कायम राहावा. या उद्देशाने हे अभियान दरवर्षी राबविले जाते. या अभियानामध्ये वर्षभरात झालेल्या अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना केली जाते. तसेच चालकांना प्रशिक्षणही दिले जाते. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधनही करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षितेची जबाबदारी, वाहतूक नियमांचे, उत्तम शरीर प्रवृत्ती आणि मनस्वास्थ्य या चतुसूत्रीचे पालन करत चालकांनाही यंदाच्या वर्षात सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन एसटीतर्फे करण्यात येणार आहे.