
कुडाळ हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
swt१०३.jpg
७४४६३
कुडाळः यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक, मान्यवर.
कुडाळ हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
१३ विद्यार्थ्यांचा समावेश ः परिस कुबल जिल्ह्यात दुसरा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेमध्ये कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीत शहरी सर्वसाधारण गटातून परिस कुबल याने ३०० पैकी २५६ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये दुर्वांक गावडे-तालुक्यात शहरी विभागात प्रथम (८७.२४), आयुषी राणे (८०.५३), यश जाधव (७७.१८), वेदांत वरुटे (७२.४८), आयुषी आपटे (७७.४६), शमिका चिपकर (६५.७७), तर आठवी शिष्यवृत्तीधारकांत परिस कुबल (८५.९०), सौमित्र मुंडले (७७.१८), आर्या चिपकर (७४.४९), राधिका चव्हाण (७१.८१), आर्या मर्गज (६९.१२), मधुरा जडये (६०.४०), हर्ष परब (५५.७०) यांचा समावेश आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना एस. जी. गंगावणे, ई. डी. जाधव, एन. एन. कांदळगावकर, एस. पी. कडुलकर, ए. ए. पोवार, एम. पी. दरवडा, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना बी. एम. तुळसकर, एस. के. परब, एस. एन. आंबेकर, एम. एन. कुबल, आर. ए. शिरसाट, वाय. एम. सामंत, आर. डी. तेली, ए. एस. मर्गज, तवटे व एस. बी. वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, सरकार्यवाह आनंद वैद्य, सहकार्यवाह सुरेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिरसाट, संस्था प्रतिनिधी का. आ. सामंत, मुख्याध्यापक दादा शिरहट्टी, उपमुख्याध्यापक दिनेश आजगावकर, पर्यवेक्षक महेश ठाकूर, आनंदा गावडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.