सावंतवाडीत नोकरीविषयक कार्य़शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत नोकरीविषयक कार्य़शाळा
सावंतवाडीत नोकरीविषयक कार्य़शाळा

सावंतवाडीत नोकरीविषयक कार्य़शाळा

sakal_logo
By

swt१०७.jpg
KOP२३L७४४८३
सावंतवाडीः ‘नोकरीच्या संधी’ कार्यशाळा प्रसंगी लखम सावंत-भोसले व अन्य.

सावंतवाडीत नोकरीविषयक कार्यशाळा
२३० विद्यार्थ्यांना लाभः एसपीके महाविद्यालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वाणिज्य तसेच बँकिंग अँड इन्शुरन्स आणि आयक्यूएसी यांच्यावतीने ‘आरबीआयमधील नोकरीच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला २३० विद्यार्थी उपस्थित होते. व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत-भोसले, आरबीआयच्या असिस्टंट जनरल मॅनेजर दीपिका नेगी, असिस्टंट मॅनेजर प्रफुल्ल ठाकूर, निखिल आमटे, ऋषी यादव, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. जी. एम. शिरोडकर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेमध्ये निखिल आमटे, प्रफुल्ल ठाकूर, दीपिका नेगी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरबीआयमधील नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या संधी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. किमान पात्रता, वर्षातून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्तराच्या परीक्षा, अभ्यासक्रम, उत्तीर्ण होण्याच्या कसोट्या आदीबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन ठाकूर, नेगी यांनी केले. या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. हर्षद राव यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सचिन देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वासुदेव बर्वे यांनी केले. कार्यशाळेला वाणिज्य विभागाच्या प्रा. सुनयना जाधव, रामचंद्र तावडे, संदेश सावंत उपस्थित होते.