अध्यक्षपदी शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी शिंदे
अध्यक्षपदी शिंदे

अध्यक्षपदी शिंदे

sakal_logo
By

rat१०१२. txt

( टुडे पान ३ साठी)

rat१०p१.jpg -
७४४३१

मंदार शिंदे

नाभिक टायगर सेनेच्या विभाग अध्यक्षपदी शिंदे

रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य नाभिक टायगर सेनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी रत्नागिरीचे मंदार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाभिक टायगर सेनेचे कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. मंदार शिंदे यांची समाजाप्रती असलेला आदर व निष्ठा तसेच समाजासाठी सतत सुरू असलेली निःस्वार्थ सेवा, सामाजिक चळवळीतील योगदान तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमाचा विचार करून त्यांची कोकण विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे या वेळी चव्हाण यांनी सांगितले.

-

rat१०p४.jpg ः
७४४३०
रत्नागिरी ः मॉर्डन पेंटॅथलॉन प्रकारात सिल्वर पदक पटकावणारा आर्यन घडशी.

मॉर्डन पेंटॅथलॉन प्रकारात आर्यन घडशीला रौप्य

रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिंपिक स्पर्धा पुणे-बालेवाडी येथे सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सात हजारापेक्षा जास्त खेळाडू विविध खेळात सहभागी झाले आहेत. शहरातील फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य व (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला शाखेचा विद्यार्थी आर्यन घडशी याची मॉडर्न पेंटॅथलॉनमधील ट्रायथले या क्रीडाप्रकारात निवड झाली. या क्रीडा प्रकारात आर्यन घडशी याने द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) मिळवून त्याने स्वतःसह आपल्या शाळेचे व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात चमकवले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून आर्यन घडशी याला स्विमिंग सूट तसेच ट्रॅकसूटदेखील दिला गेला. आर्यनने मिळवलेल्या या बहुमूल्य यशाबद्दल फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला वाणिज्य व (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर लेले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे क्रीडाशिक्षक व क्रीडाप्रमुख मंदार सावंत यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
--
rat१०p३.jpg ः
७४४२९
रत्नागिरी ः अरविंद नांदगावकर यांना गौरवतांना विश्वकर्मा वंशिय समाज संघाचे नागोजीराव पांचाळ.
---
अरविंद नांदगावकर यांना समाजभूषण पुरस्कार

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा पांचाळ सुतार समाजसंघातर्फे जिल्हा मेळावा चिपळूण येथे नुकताच उत्साहात झाला. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार रमेश कदम, आमदार सदानंद चव्हाण, वासुदेव (अप्पा) मिस्त्री, सचिन कदम, जयंत खताते, मिलिंद कापडी, विनोद झगडे तसेच विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष नागोजीराव पांचाळ, विश्वकर्मा पुराण अभ्यासक मच्छिंद्रनाथ चारी, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सेवासंघ मुंबईचे कृष्णकुमार काणेकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात शोभायात्रा, व्याख्यान, स्मरणिका प्रकाशन, कलादालन, विद्यार्थी गुणगौरव, समाजभूषण पुरस्कार आदी कार्यक्रम उत्साहात झाले. या वेळी गेली अनेक वर्षे समाजासाठी कार्यरत असणारे अगदी पांचाळ-सुतार समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे समाजसंघाचे माजी सरचिटणीस अरविंद नांदगावकर यांना विश्वकर्मा वंशिय समाज संघाचे राज्याध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
--
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

रत्नागिरी ः सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन ९ ते ११ जानेवारी या कालावधीत लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, फणसोप येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळा सहभागी झाल्या आहेत. उद्या (ता.११) पर्यंत १० ते सायं. ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले असेल. आज विज्ञानदिंडी, उद्घाटन, प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम तर ११ जानेवारीला व्याख्यान व बक्षिस वितरण होणार आहे, असे गट‍शिक्षणाधिकारी पंचायत समिती रत्नागिरी यांनी कळवले आहे.
--
पात्र मतदारांना नैमित्तिक रजा

रत्नागिरी ः महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक भारत निवडणूक आयोगाने घोषित केली असून, मतदान ३० जानेवारीला होणार आहे. उक्त मतदार संघातील मतदारांना मतदान करता यावे म्हणून निवडणुकीच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नैमित्तिक रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी श्रीकांत गायकवाड यांनी कळवले आहे.
-
चवंडे यांच्या नेतृत्वाखाली आयुष्मान भारत योजना

रत्नागिरी ः रविवारी (ता. ८) जानेवारीला प्रभाग क्र. १४ मध्ये नगर पालिका शाळा क्र. ३ येथे आयुष्मान भारत कार्ड योजना राबवण्यात आली. या वेळी नगरसेवक मुन्ना चवंडे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सचिन करमरकर, दादा ढेकणे, वर्षा ढेकणे, माजी नगरसेविका सत्यवती बोरकर, सत्यवान बोरकर, सचिन गांधी, केदार बोरकर, नचिकेत पावसकर, नरेंद्र चवंडे उपस्थित होते.