संगमेश्वर ः 572 जनावरांना लम्पीची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः 572 जनावरांना लम्पीची लागण
संगमेश्वर ः 572 जनावरांना लम्पीची लागण

संगमेश्वर ः 572 जनावरांना लम्पीची लागण

sakal_logo
By

rat१०१५.txt

( टुडे पान ३)

संगमेश्वर तालुक्यात ५७२ जनावरांना लम्पीची लागण

संगमेश्वर, ता. १० ः तालुक्यातील ५७२ जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. ५२ जनावरे मृत, २९० जनावरे उपचार घेऊन बरी झाली असून १७९ जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशुधन विस्तार अधिकारी पांडुरंग पोवार यांनी दिली. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. उदरनिर्वाहासाठी शेतीबरोबर दुग्धोत्पादनासाठी गाई व म्हैशींचे पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन केले जाते.
लम्पी आजाराने सर्वत्र डोके वर काढले आहे. शासनाच्यावतीने पशुधन विभागाच्यावतीने लम्पी आजाराचा समूळ नायनाट करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. पशुपालकांमध्ये जनजागृती करणे, जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. काटवली, विघ्रवली, देवडे, भोवडे, किरबेट, साखरपा, माखजन, आरवली, वाशी, सोनवडे, बोरसूत आदी विविध गावांमध्ये लम्पी आजाराची लागण झालेली ५७२ जनावरे मिळून आली आहेत. यातील ५२ जनावरे मृत झाली आहेत. उपचाराअंती २९० जनावरे बरी झाली आहेत. १७९ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांत मृत जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. वयस्कर व अशक्त जनावरे मृत होत आहेत. खबरदारी म्हणून सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेल्या वासरांना व गाईंना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी गाफील राहू नये, जनावरे आजारी पडल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोवार यांनी केले आहे.