सायकल संमेलन विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल संमेलन विशेष
सायकल संमेलन विशेष

सायकल संमेलन विशेष

sakal_logo
By

rat१०२३.txt

बातमी क्र.. २३ ( टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१०p१३.jpg-
७४४६२
रत्नागिरी ः होम मिनिस्टरचं सायकलिंग या विषयावर बोलताना धनश्री गोखले. सोबत अश्विनी गणपत्ये, मुग्धा भट-सामंत, मृणाल खानविलकर.


पती किंवा मुलांपेक्षा सरस सायकलिंग

महिलानी मांडले अनुभव ; शस्त्रक्रियेनंतरही सुरू

रत्नागिरी, ता. १० ः पती किंवा मुलासोबत सायकलिंग सुरू करून त्यात कौशल्य प्राप्त करत आता या दोघांपेक्षाही सायकलिंगमध्ये कांकणभर सरस कामगिरी करता येते. आपले घरचे सर्व कामकाज सांभाळून, नोकरी-व्यवसायातून वेळ काढून महिलांनी सायकलिंग केलेच पाहिजे, असा आग्रही सूर सायकल संमेलनाच्या महिलांच्या सत्रात उमटला.
सायकल संमेलनात होम मिनिस्टरचं सायकलिंग आणि वर्कलाईफ बॅलन्स या सत्रामध्ये धनश्री गोखले, अश्विनी गणपत्ये, मुग्धा भट-सामंत, मृणाल खानविलकर यांनी विवेचन केले. प्रसाद देवस्थळी यांनी त्यांना बोलते केले. गोपालक असणाऱ्या मृणाल खानविलकर म्हणाल्या, पती मिलिंदमुळे मी सायकलिंग क्षेत्राकडे वळले. मुलंसुद्धा सायकलिंगसाठी मदत करतात. धनश्री गोखले म्हणाल्या, चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपक्रमात भाग घेते. महिलांनी सायकलिंग जरूर करावे. मुग्धा सामंत म्हणाल्या, २०१९ मध्ये कॅन्सरची शस्त्रक्रिया करावी लागली नंतर कॅल्शियम कमी, अॅंकल इंज्युरी यामुळे आजारी होते. वॉकर घेऊन घरातच चालायचे. पाय टेकला तरी थरथरायचे. डॉक्टरांनी सायकलिंगचा सल्ला दिला. पतीसोबत आठवडा बाजार ते किल्ला इथपर्यंत सायकलिंग सुरू केले. गेल्या वर्षी शहरातून मिऱ्यापर्यंत असे २५०० किमी सायकलिंग केले.
--