विद्यार्थ्यांनो लिहिते व्हा, आम्ही प्रकाशित करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनो लिहिते व्हा, आम्ही प्रकाशित करू
विद्यार्थ्यांनो लिहिते व्हा, आम्ही प्रकाशित करू

विद्यार्थ्यांनो लिहिते व्हा, आम्ही प्रकाशित करू

sakal_logo
By

rat1025.txt

(टुडे पान 3 साठी)


rat10p22.jpg-

74474
रत्नागिरी ः कालिदास व्याख्यानमालेमध्ये कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी. सोबत डॉ. कल्पना आठल्ये.

विद्यार्थ्यांनो लिहिते व्हा, आम्ही प्रकाशित करू

डॉ. पेन्ना; कालिदास व्याख्यानमालेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. 10 ः संस्कृत ही सर्वसमावेशक भाषा आहे. त्यामुळे विविधांगी विषयांवरील लेखन विद्यार्थी, अभ्यासू करू लागले आहेत. संस्कृत वृत्तपत्रे, नियतकालिके चालवली जात आहेत. त्यात सद्यःस्थितीवरील लेख, बातम्या लिहून आपणही यात सहभाग घेतला पाहिजे. आपल्या भावना आपण शब्दरूपाने व्यक्त करतो तेव्हा चांगले लेखन होते. लेखनासाठी प्रेरणा महत्त्वाची आहे. तुम्ही लिहिते व्हा आणि त्याचे पुस्तक रामटेकचे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नक्की प्रकाशित करेल, अशी ग्वाही विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी दिली.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागाच्यावतीने 66व्या कालिदास स्मृती समारोहात आधुनिक संस्कृत साहित्यनिर्मिती या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विद्यार्थी, संस्कृतप्रेमी नागरिक उपस्थित होते. या वेळी प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी कुलगुरू डॉ. पेन्ना यांचा सत्कार केला. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी कालिदास व्याख्यानमालेचा थोडक्यात इतिहास सांगितले. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. पेन्ना यांनी एकेकाळी हिब्रू ही मृतभाषा होती; परंतु त्यावर तज्ञांनी काम केले व ही भाषा पुनरुज्जीवित झाली. संस्कृतच्या प्रचारप्रसारासाठी ही भाषा बोलली गेली पाहिजे व जास्तीत जास्त साहित्य लिहिले गेले पाहिजे. संस्कृतमध्ये पाणिनी, भर्तुहरी, कालिदास असे एकाहून एक सरस साहित्यिक होऊन गेले. साहित्यातून समाजात परिवर्तन होते. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथेही संस्कृत विद्वान लेखन करत आहेत.