राजापूर ः2 महिन्यात 17 लाखाचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः2 महिन्यात 17 लाखाचे उत्पन्न
राजापूर ः2 महिन्यात 17 लाखाचे उत्पन्न

राजापूर ः2 महिन्यात 17 लाखाचे उत्पन्न

sakal_logo
By

राजापूर आगाराला २ महिन्यात १७ लाखांचे उत्पन्न

लग्नसराईसाठी एसटीला पसंती; सहलींनीही दिला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः सर्वसामान्यांची गाडी म्हणून ओळखल्या जात असलेल्या एसटीला उत्पन्नाच्यादृष्टीने कोरोनामध्ये ब्रेक लागला होता. मात्र, कोरोना महामारी दूर होताच एसटी सेवा आता पूर्वपदावर आली आहे. शाळेय मुलांच्या शैक्षणिक सहली जाऊ लागल्या असून लग्नसराईसाठी यजमानांकडून एसटी गाड्यांची मागणी वाढू लागली आहे. आगारप्रमुख शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.लग्नसराई आणि शैक्षणिक सहलींद्वारे गेल्या दोन महिन्यांमध्ये राजापूर आगाराला १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गावागावामध्ये धावणारी लालपरी ही सर्वसामान्यांची गाडी म्हणून ओळखली जात आहे. दिवसागणिक खासगी गाड्यांची संख्या वाढत चालली असली तरी सर्वसामान्यांकडून आजही एसटीला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, कोरोना महामारीमध्ये गावोगावी धावणार्‍या एसटी गाड्यांना ब्रेक लागला होता. उत्पन्न घटल्याने एसटी महामंडळाला काहीसा तोटाही सहन करावा लागला होता. मात्र, कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे एसटी गाड्या आता गावोगावी धावू लागल्या आहेत. एसटीला पूर्वीप्रमाणे उत्पन्न मिळू लागले आहे. एसटीचा गाडा पूर्वपदावर येऊ लागला असताना पूर्वीप्रमाणे आता यजमानांकडून लग्नसराईसाठी एसटीला पसंती मिळू लागली आहे. त्याचवेळी कोरोना महामारीमध्ये थांबलेल्या शैक्षणिक सहली पुन्हा एकदा सुरू झाल्या असून त्यासाठी एसटी गाड्यांना शाळांकडून मागणी वाढू लागली आहे.
लग्नाच्या वर्‍हाडाची वाहतूक करण्यासाठी यजमानांकडून ३१ गाड्या बुकिंग करण्यात आल्या होत्या. आगाराला ४ लाख १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले तर, शैक्षणिक सहलीसाठी २० गाड्या बुकिंग करण्यात आल्या होत्या. आगाराला २ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. नव्या वर्षामध्ये आजपर्यंत लग्नसराई आणि शैक्षणिक सहलीसाठी ५० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले असून, आगाराला सुमारे १० लाख रुपये मिळाले असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली. आगारप्रमुख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागणीप्रमाणे राजापूर एसटी आगाराने गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याचा फायदा यजमानांसह शाळांना फायदा झाला आहे. त्याचवेळी आगारालाही उत्पन्नाच्यादृष्टीने फायदा झाला आहे.