फोटोसंक्षिप्त-माणगाव वाचनालयात निबंध स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-माणगाव वाचनालयात 
निबंध स्पर्धेला प्रतिसाद
फोटोसंक्षिप्त-माणगाव वाचनालयात निबंध स्पर्धेला प्रतिसाद

फोटोसंक्षिप्त-माणगाव वाचनालयात निबंध स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

७४५६०
जटाशंकर गणपती मंदिरात
फुलांची आकर्षक सजावट
सावंतवाडी ः हळदीचे नेरुर (ता. कुडाळ) येथील श्री जटाशंकर गणपती मंदिरात अंगारकीनिमित्त केलेली फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली. यासाठी राहुल सावंत, राणोजी परब, सुनील सावंत, भाई सावंत यांचे सहकार्य लाभले. अनंत लुष्टे यांनी कोल्हापूर येथून घाऊक दरात फुले उपलब्ध करून दिली. या उपक्रमात भाविकांनी स्वेच्छेने सहभाग घेतला. रवी वारंग यांनी श्री चरणी एक हजार दुर्वांचा अभिषेक केला. या सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा म्हाडगूत यांनी भेट देऊन ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
---
७४५६१

माणगावात निबंध स्पर्धा उत्साहात
माणगाव ः श्री वा. स. वाचनालय, माणगावने सुरू केलेल्या ‘वाचनालय शाळांच्या दारी’ उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त या उपक्रमात शाळांना वितरित केलेल्या पुस्तकातील जे पुस्तक मुलांना आवडले, त्यावर आधारीत ‘मी वाचलेले पुस्तक’ विषयावर निबंध स्पर्धा झाली. या स्पर्धेला पहिली ते चौथीतील १७ व पाचवी ते सातवीतील १५ असे एकूण ११ शाळांमधील ३२ विद्यार्थी सहभागी झाले. संचालक सदाशिव पाटील यांनी स्वागत करून निबंध स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या. संचालक शरदचंद्र कोरगावकर यांनी समारोप केला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या वार्षिक वितरण समारंभात पहिल्या तीन विद्यार्थ्यांना आणि उत्तेजनार्थ एका विद्यार्थ्याला रोख बक्षीस, संस्थेचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुस्तके वितरित केलेल्या १७ शाळांमध्ये प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांने जास्तीत जास्त पुस्तके वाचलेली आहेत, त्यालाही संस्थेतर्फे गौरविण्यात येणार आहे.