गुहागर ः प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
गुहागर ः प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

गुहागर ः प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

sakal_logo
By

प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आज उद्घाटन
गुहागर, ता. १० ः शृंगारतळी येथील हॉटेल हेमंतसमोर, सकिना कॉम्प्लेक्समध्ये डॉ. सचिन बाळकृष्ण ओक व डॉ. अश्विनी सचिन ओक यांच्या प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवारी (ता.११) सकाळी ११ वा. बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर संतोष सावंतदेसाई यांच्या हस्ते होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. सचिन ओक पूर्णवेळ रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. नेत्रचिकित्सक डॉ. अश्विनी ओक या देखील पूर्णवेळ रुग्णसेवा देणार आहेत. त्यांनी मधुमेही रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया व उपचार या विषयात विशेष प्रावीण्य मिळवले आहे. अस्थीरोग तज्ज्ञ आठवड्यातून दोनवेळा, स्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूर्वा रिळकर-पवार महिन्यातून पहिल्या शनिवारी रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत. हॉस्पिटलमध्ये सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग असून, सर्व शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये होतील, अशी माहिती डॉ. सचिन ओक यांनी दिली. या हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, सुसज्ज नेत्रविभाग रेटिना शस्त्रक्रियेची सुविधा आहे, २४तास आपत्कालीनसेवा उपलब्ध असणार आहे.