अंगारकी संकष्टीनिमित्त रेडी येथे भविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगारकी संकष्टीनिमित्त
रेडी येथे भविकांची गर्दी
अंगारकी संकष्टीनिमित्त रेडी येथे भविकांची गर्दी

अंगारकी संकष्टीनिमित्त रेडी येथे भविकांची गर्दी

sakal_logo
By

74595
रेडी ः अंगारकी संकष्टीनिमित्त येथील द्विभूज गणपतीचे दर्शन घेतले.

अंगारकी संकष्टीनिमित्त
रेडी येथे भविकांची गर्दी
वेंगुर्ले, ता. १० ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान रेडी (ता. वेंगुर्ले) येथील द्विभूज गणपतीच्या दर्शनाला आज भविकांचा जनसागर लोटला. अंगारकी संकष्टीनिमित्त आज हजारो भाविकांनी रेडीच्या द्विभूज गणपतीचे दर्शन घेतले.
पहाटेपासून श्री गजाननाच्या दर्शनाला भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी भागांतून मोठ्या प्रमाणात भाविकांनी श्री गजाननाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांना योग्य प्रकारे दर्शन व्हावे, यासाठी श्री गजानन देवस्थानच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते. भाविकांना खिचडी प्रसादाचेही वाटप देवस्थानच्या वतीने करण्यात आले. गजाननाच्या दर्शनासाठी मंदिरापासून सुमारे २०० ते ३०० मीटरपर्यंत भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. दुपारपर्यंत गणपती मंदिरापासून माऊली मंदिरपर्यंत चारचाकी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.