सोन्याचे खोटे दागिने बँकेत ठेवण्याचा प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याचे खोटे दागिने बँकेत ठेवण्याचा प्रकार
सोन्याचे खोटे दागिने बँकेत ठेवण्याचा प्रकार

सोन्याचे खोटे दागिने बँकेत ठेवण्याचा प्रकार

sakal_logo
By

rat१०२८.txt

( पान ३)

खोटे दागिने बँकेत ठेवण्याचा प्रयत्न

चिपळुणमधील प्रकार ; नागरिकांचा ''बंगालीबाबू''ला प्रसाद

चिपळूण, ता. १० ः पैशांसाठी एका बँकेत सोन्याचे खोटे दागिने तारण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार काल (ता.९) सकाळी चिपळूण येथील भर बाजारपेठेत घडला. ओळखीचा फायदा घेत एका महिलेमार्फत ते खोटे दागिने बँकेत ठेवण्यासाठी देणाऱ्या बंगाली व्यावसायिकाचा हा कारनामा समोर आला. संतप्त नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्याला प्रसाद देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. शहरात दिवसभर या प्रकाराची चर्चा सुरू होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सोमवारी सकाळी एक महिला सोन्याचे दागिने घेऊन शहरातील चिंचनाका परिसरातील एका बँकेत गेली. ते दागिने तारण ठेवायचे असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर ते दागिने बँकेच्या सोनाराने पाहिले. या वेळी त्याला ते दागिने खोटे असल्याचा संशय आला. त्याने त्या दागिन्यांची सखोल तपासणी करताच ते खोटे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या महिलेकडे हे दागिने कुणाचे आहेत, कुठून आणले, खोटे दागिने बँकेत ठेवण्यासाठी कशाला आणले? असे अनेक प्रश्न त्या सोनाराने विचारताच त्या महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली. हा काय प्रकार आहे तेच तिला कळेनासे झाले. त्या खोट्या दागिन्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने सांगत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. बँकेत खाते असल्याने ते दागिने तिच्या ओळखीतील एका बंगाली सोनाराने बँकेत ठेवण्यासाठी दिल्याची माहिती तिने दिली. सर्व प्रकार लक्षात येताच त्या महिलेमार्फत त्या बंगाली व्यावसायिकाला तेथे बोलावण्यात आले. तो येताच संतप्त नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्याला पकडून रस्त्यावरून घेऊन जाताना बघ्यांची गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात न झाल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, काही नागरिकांनी त्या बंगाली बाबूने शहरातील अनेकजणांना गंडा घातल्याचाही आरोप केला.