सकाळी सोसाट्याचा वारा, रात्री थंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळी सोसाट्याचा वारा, रात्री थंडी
सकाळी सोसाट्याचा वारा, रात्री थंडी

सकाळी सोसाट्याचा वारा, रात्री थंडी

sakal_logo
By

rat११२१.txt

बातमी क्र. २१ (टुडे पान ४ साठीमेन)

फोटो ओळी
-rat११p५.jpg ः
७४७१६
राजापूर ः आंबा कलमांना नव्याने आलेला फुलोरा.
-rat११p६.jpg ः
७४७१७
आंब्याने लगडलेले झाड.
--

सकाळी सोसाट्याचा वारा, रात्री थंडी

आंब्याचा हंगाम अडचणीत ; फळगळतीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये थंडीची प्रमाण वाढले असून हवेमध्ये दिवसभर कमालीचा गारठा राहत आहे. त्याचवेळी सागरी किनारपट्टीवरील भागामध्ये सकाळच्यावेळी सोसाट्याचा वाराही सुटत आहे. या प्रतिकूल परिस्थितीचा आंब्याला फटका बसून फळगळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फवारणीसह अन्य कामांसाठी मोठ्याप्रमाणात खर्च करूनही फळधारणा म्हणावी तितकीशी झालेली नाही. असे असतानाही नव्याने प्रतिकूल वातावरणाचा फटका बसून फळगळती झाल्यास मोठा नुकसानीचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.
लांबणीवर पडलेल्या पावसामुळे यावर्षी आंबा कलमांना उशीरा फुलोरा आला. मात्र, फुलोरा येण्यासाठी अपेक्षित असलेले थंडीचे प्रमाण कमी असल्याने आंबा कलमांना म्हणावा तेवढा फुलोरा आलेला नाही. त्याच्यामध्ये फुलोऱ्यावर बुरशी पडणे, तुडतड्याचा प्रादुर्भाव यांसह फुलोरा काळा पडणे आदी विविध कारणांमुळे फुलोऱ्यातून फळधारणेचे प्रमाणही तुलनात्मदृष्ट्या कमी राहीले. फळधारणेतून मिळणाऱ्‍या उत्पन्नातून फवारणीसह अन्य मशागतींच्या कामांसाठी केलेला खर्चही निघेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीतही बागायतदार समाधानी असताना गेल्या काही दिवसांपासून बदलेल्या वातावरणाने पुन्हा एक बागायतदारांची चिंता वाढविली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्यामध्ये दिवसभर हवेमध्ये गारठा राहत आहे. त्याचवेळी सकाळच्यावेळी विशेषतः तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवरील भागामध्ये सोसायट्याचा वारा सुटत आहे. दोन-तीन दिवसांपासून बदलेल्या या वातावरणामध्ये आंबा कलमांवर तयार होत असलेल्या कैरीला फटका बसून तिची गळती होण्याची भिती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला वाढत्या थंडीमुळे नव्याने कलमांना फुलोरा येण्याची शक्यता आहे. असे होवून झाडांना पुन्हा फुलोरा आल्यास झाडावर सद्यस्थितीमध्ये असलेल्या कैरीची गळती होवून नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
---
कोट
गेल्या दोन दिवसांपासून जोरदार थंडी आणि सकाळच्यावेळी सोसाट्याचा वारा सुटत आहे. त्याचा फटका बसून आंबा गळती होवून बागायतदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला वाढत्या थंडीमुळे पुन्हा फुलोरा येण्याचीही शक्यता आहे. त्यातून बागायतदारांना नुकसानीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
--ओंकार प्रभूदेसाई, आंबा बागायतदार