कचरा उचलण्यासाठी सावंतवाडीत ‘ई-रिक्षा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा उचलण्यासाठी
सावंतवाडीत ‘ई-रिक्षा’
कचरा उचलण्यासाठी सावंतवाडीत ‘ई-रिक्षा’

कचरा उचलण्यासाठी सावंतवाडीत ‘ई-रिक्षा’

sakal_logo
By

74774
सावंतवाडी ः ई-रिक्षामधून कचरा उचलताना पालिका कर्मचारी.

कचरा उचलण्यासाठी
सावंतवाडीत ‘ई-रिक्षा’

घंटागाड्यांना पर्याय; पालिकेकडून यशस्वी चाचणी

सावंतवाडी, ता. ११ ः घंटागाड्यांना पर्याय म्हणून शहरातील कचरा उचलण्यासाठी सावंतवाडी पालिकेने आणलेल्या ''ई-रिक्षा'' नागरिकांच्या सेवेत उतरल्या आहेत. पहिल्या टप्प्यात काल (ता. १०) दोन गाड्यांची आरोग्य विभागाकडून चाचणी घेण्यात आली. यावेळी नागरिकांच्या प्रतिक्रिया व कचरा उचलण्याची गती याच्या नोंदी करण्यात आल्या. या वाहनांमुळे सफाई कामगारांची मेहनत वाचणार असून जलद गतीने कचरा उचलण्याचे काम होईल. इंधनाचा खर्चही कमी येईल, असे प्रात्यक्षिकावरून दिसून आल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत प्रतिक्रिया देताना, शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलण्यासाठी सहा ई-रिक्षा पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची मेहनत वाचविण्यासाठी घंटागाड्यांना पर्याय म्हणून या ई-रिक्षा सेवेत आणल्या आहेत. नुकतेच या गाड्यांचे आरटीओ पासिंग झाल्यानंतर काल दोन गाड्यांची ट्रायल घेण्यात आली. यावेळी या गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा गोळा करण्यात आला. या दरम्यान नागरिकांच्या प्रतिक्रिया व कचरा उचलण्याची गती याच्या नोंदीही करण्यात आल्या, अशी माहिती दिली. या गाड्यांमध्ये सुका, ओला व सॅनिटरी वेस्ट कचरा असे तीन विभाग आहेत. त्यानुसार नागरिकांनी कचऱ्याचे विलगीकरण करून गाड्यांमध्ये कचरा द्यावा. जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही. यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स राहून त्या अधिक काळ चांगली सेवा देतील. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.