दापोलीत कॉँग्रेसची १५ ला बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीत कॉँग्रेसची १५ ला बैठक
दापोलीत कॉँग्रेसची १५ ला बैठक

दापोलीत कॉँग्रेसची १५ ला बैठक

sakal_logo
By

दापोलीत काँग्रेसची
१५ ला बैठक
दाभोळः काँग्रेसची दापोली तालुक्याची बैठक १५ जानेवारीला पेन्शनर्स सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. सद्यःस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच स्तरावर पक्षाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी परस्परातील मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने पक्षासाठी काम करण्याची गरज आहे. भविष्यात पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पक्षाची तालुका कार्यकारिणी ठरवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन दापोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनंत (भाऊ) मोहिते यांनी केले आहे.
-------------
भात खरेदी केंद्र
केळशीत सुरू
दाभोळः केळशी आंबा संघामार्फत चालवण्यात येणारे शासनाचे भातखरेदी केंद्र अखेर सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हे केंद्र शासनाच्या गोदामात चालवले जात असून ती इमारत महसूल खात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे प्रत्येक वर्षी त्याची प्रक्रिया पूर्ण करून संघाला ते ताब्यात घ्यावे लागते; पण हा ताबा देण्यासाठी पुरवठा विभागाकडून अनेक अडचणी निर्माण केल्या जात असतात. या वर्षी तर ताबा देण्यास खूप उशीर झाला. याकरिता काही शेतकरी आंबासंघाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करून अखेर ताबा मिळवला असून या अडचणीमुळे केंद्र सुरू होण्यास उशीर झाला होता. या वर्षी भातासाठी २ हजार १०० इतकी आधारभूत किंमत शासनाने ठरवून दिली आहे. त्यात राज्य शासनाने हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे भात पिकवणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
----------------
‘रामराजे’ मध्ये
स्नेहसंमेलन
दाभोळः विद्यार्थ्यांनी ध्येय मोठी ठेवावीत, जे प्राप्त झाले नाही ते प्राप्त करण्याची इच्छा व महत्वाकांक्षा बाळगावी आणि एकदा एखादी गोष्ट जर प्राप्त झाली मग ती विद्या, कौशल्य, कला, ज्ञान, संपत्ती किंवा कोणतीही वस्तू असो त्याचे काळजीपूर्वक रक्षण करावे, असे प्रतिपादन प्रा. अशोक देशमुख यांनी केले. दापोली येथील रामराजे महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे, संदीप राजपुरे, स्मिताली राजपुरे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, प्राचार्य वेदिका राणे, नगरसेविका रिया सावंत, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे आदी उपस्थित होते.