
विज्ञान प्रदर्शनात नाईकचे यश
74795
सावंतवाडी : मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक स्वीकारताना कृष्णा नाईक.
विज्ञान प्रदर्शनात नाईकचे यश
सावंतवाडी ः मिलाग्रीस हायस्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोनुर्ली हायस्कूलचा विद्यार्थी कृष्णा नाईक याने तयार केलेल्या ‘होम सिक्युरिटी अलार्म’ या उपकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कृष्णा याच्यासह त्याचा सहकारी जिग्नेश गावकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, मिलाग्रिसचे प्राचार्य रिचर्ड सालदान्हा, उपप्राचार्या मेबल कार्वालो, पर्यवेक्षक मेघना राऊळ, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सर्व केंद्रप्रमुख व मार्गदर्शक शिक्षक पी. जी. काकतकर उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण सहभागी ७५ प्रतिकृतींतून ही निवड झाली आहे.
---
74796
सोनुर्ली ः विजेत्या संघाला सन्मानित करताना मान्यवर.
सोनुर्ली संघ विजेता
सावंतवाडी, ता. ११ ः सोनुर्ली-पाक्याचीवाडी ग्रामस्थ व मित्रमंडळ आयोजित सोनुर्ली प्रीमियर पर्व तिसरेमध्ये सोनुर्ली संघ विजेता, तर छत्रपती वॉरियर्स उपविजेता ठरला. या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेंतर्गत लकी ड्रॉचे आयोजन केले होते. त्याची सोडतही बक्षीस वितरण प्रसंगी करण्यात आली. विजेत्यांनी आपली बक्षिसे मंडळाकडून पंधरा दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.