ओणीत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओणीत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
ओणीत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

ओणीत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

sakal_logo
By

rat११२२.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat११p९.jpg ः
७४७२०
राजापूर ः करिअर मार्गदर्शन शिबिराला उपस्थित उपस्थित विद्यार्थी.
-----
ओणीत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता लक्षवेधी आहे. मात्र, त्यांना भविष्यामध्ये आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. हीच बाब ओळखून मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर संलग्न शैक्षणिक विभागांतर्गत ‘मार्गदर्शन आमचे, निवड तुमची’ या संकल्पनेवर आधारित करिअर मार्गदर्शन शिबिर झाले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह सार्‍यांनी नवा ‘कोकण पॅटर्न’ निर्माण करण्याचा नारा दिला.
सुभाष तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ओणी येथील श्री साई विमलेश्‍वर मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये आयकर निरीक्षक वैभव भगते, राजापूरच्या पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, श्री सरस्वती विद्यानिकेतन शाळा खावडी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.डी. देसाई यांनी विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्यादृष्टीने मार्गदर्शन केले. या वेळी भगते यांनी दहावी-बारावीनंतरची तयारी, केंद्रस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, प्रशासकीय-शासकीय नोकरभरती आदींबाबत सविस्तर माहिती देताना त्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.