जनाधाराचा टक्का 35 वर नेणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनाधाराचा टक्का 35 वर नेणे आवश्यक
जनाधाराचा टक्का 35 वर नेणे आवश्यक

जनाधाराचा टक्का 35 वर नेणे आवश्यक

sakal_logo
By

rat११२८.txt

बातमी क्र.. २८ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat११p३१.jpg-
७४८०६
रत्नागिरी ः पत्रकार परिषदेत बोलताना मधुकर शेट्ये.
---

जनाधाराचा टक्का ३५ वर नेणे आवश्यक

विकास शेट्ये ; विचारधारेवरच काम करणारे हवेत लोकप्रतिनिधी

रत्नागिरी, ता. १२ ः आपली लोकशाही स्थिर करायची असेल तर निवडणूक प्रक्रियेत बदल घडवण्याची गरज आहे. एका संघटनेची विचारधारा पक्की करून त्या विचारधारेवरच काम करणारे लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत. मग अपक्षांची गरज भासणार नाही. लोकशाहीत लोकप्रतिनिधी बहुमताने निवडण्याचा अधिकार आहे तसा बहुमताने परत बोलावण्याचा नाही. एकूण मतदारांच्या २५ ते २६ टक्के जनाधार आला तरी बहुमत होते ते ३५ टक्केवर नेणे आवश्यक आहे. निवडणुकीत नोटाचा (नकारात्मक मत) अधिकारी आहे; परंतु त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे फेरनिवडणूक झालेली नाही, अशा प्रमुख बदलांसांठी जनजागृती करण्याचा निर्धार विकास शेट्ये यांनी केला आहे.
येथील हॉटेल विवेकमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जनजागृतीतून असा नियम कायदा करावा लागेल त्यासाठी वैयक्तिकरित्या मी प्रयत्न करणार आहे. मी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या ३६ ठिकाणी भेटी देता येतील आणि आपले म्हणणे त्या त्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठवता येईल. त्यातून विद्यमान लोकप्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबवणारे आणि शासनयंत्रणा तसा निर्णय घेतील, यासाठी हे आवाहन करत आहे. स्वातंत्र्यानंतर निवडणुका लढण्यासाठी विविध राजकीय संघटना आपापले विचार घेऊन कार्यरत झाल्या. काँग्रेस संघटनादेखील काही व्यक्तिगत स्वार्थाच्या विचारांमुळे आता मूळ विचारांपासून दूर झालेली पाहावयास मिळते आहे. सर्वच राजकीय संघटना आपले विचार घेऊन निवडणूक प्रक्रियेतून राज्याचा कारभार आपल्या हाती मिळावा म्हणून प्रयत्न करतात. आता लोकशाही अस्थिर, अस्थिर सरकार आहे. यामुळे प्रगतीला खीळ बसून नियोजनाचा अभाव आहे. म्हणून विचारधारा पक्की आणि त्या विचारधारेवरच काम करणारे लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत.