
चिपळुणात आज चित्रप्रदर्शनाचे उदघाटन
चिपळुणात आज चित्रप्रदर्शनाचे उदघाटन
चिपळूण, ता. ११ ः स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरात जीवन विकास सेवासंघ यांच्यावतीने (कै.) ज्येष्ठ चित्रकार हेमलता ओतारी (आई ) यांचे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. या निमित्त महत्वपूर्ण संकल्प करण्याचा निर्धारही करण्यात येणार असल्याचे संस्थापक, अध्यक्ष, महिला उद्योजक संगीता ओतारी यांनी सांगितले. हा चित्रप्रदर्शन व उद्घाटनाचा कार्यक्रम बाजारपूल येथील डॉ. कुंदन ओतारी यांच्या दवाखान्यातील वरील सभागृहात गुरुवारी (ता. १२) सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. या जयंतीच्या निमित्ताने (कै.) ज्येष्ठ चित्रकार हेमलता ओतारी (आई ) यांनी रेखाटलेली स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तीमत्व दर्शवणाऱ्या तीन ते पाच फुटी चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्येष्ठ चित्रकार हेमलता ओतारी (आई ) यांचा जीवनप्रवास यावर आधारित पुस्तकाची निर्मिती करणे तसेच वालोपे येथे आईंच्या स्वप्नातील स्वामी विवेकानंद यांच्या ध्यानकेंद्राची निर्मिती करण्याबाबतचा संकल्प सर्वांच्या साक्षीने करण्यात निर्धार करण्यात येणार आहे. त्याची रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याचे संगीता ओतारी यांनी सांगितले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ओतारी यांनी केले आहे.