
गोगटेच्या विद्यार्थ्यांची आंबा घाट येथे क्षेत्र भेट
rat१२१७.txt
(टुडे पान ३ साठी)
गोगटेच्या विद्यार्थ्यांची आंबाघाट येथे क्षेत्रभेट
वनसंपदेचे निरीक्षण ; मेढीतील देवराईलाही भेट
रत्नागिरी, ता. १२ ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग प्रतिवर्षी विविध ठिकाणच्या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. यंदा प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या ३५ विद्यार्थ्यांसाठी आंबाघाट ते विशाळगड मार्गावरील वनसंपदेचे निरीक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घेतली. वनस्पतींचे वैविध्य, वितरण, गुणविशेष आणि पर्यावरणातील त्यांची भूमिका यांचा अभ्यास केला.
या निसर्गभेटीत भामण, अंजन, पापट, बुरूंबी/गोमा, करंज, अघडा, निगडी, पिम्पीनेला हेनेना आणि कानफुटी या वनस्पतींची माहिती देण्यात आली. यांसह रानवांगी, दिंडा, उंबर, रानमिरी, नरक्या/अमृता या वनौषधींची ओळख करून देऊन त्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. परतीच्या मार्गावर असलेल्या मेढी (सुर्वेवाडी) येथील देवराईसदेखील भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी येथील देवराईमधील वनसृष्टीचे आरेखन केले. या परिसंस्थेत अतिप्राचीन वृक्षवल्लीमध्ये काटेसावर, आसण, अनंतमूळ आणि जांभूळ यासारख्या वनस्पती आढळतात. या एकदिवसीय निसर्ग सहलीत अनेक दुर्मिळ आणि उपयुक्त असलेल्या वनस्पतींची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आली. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद आपटे यांनी मार्गदर्शन केले. निसर्गभेटीसाठी भागातील प्रा. ऋतुजा गोडबोले, प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे आणि महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.