राष्ट्रीय लोक अदालतीचे 11 फेब्रुवारीला आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय लोक अदालतीचे 11 फेब्रुवारीला आयोजन
राष्ट्रीय लोक अदालतीचे 11 फेब्रुवारीला आयोजन

राष्ट्रीय लोक अदालतीचे 11 फेब्रुवारीला आयोजन

sakal_logo
By

राष्ट्रीय लोक अदालतीचे
११ फेब्रुवारीला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ : राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ११ फेब्रुवारीला केले आहे. या लोकन्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई व वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जाती व जमाती महामंडळ, मुंबई यांची थकीत कर्ज प्रकरणे ठेवली जाणार आहेत. या लोकन्यायालयामध्ये थकीत कर्जदाराने तडजोड करावी व संबंधित योजनेतील व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर यांनी केले आहे. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्य़ाकडील ओबीस महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा योजना लागू केली आहे. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे थकीत असलेल्या कर्जावरील व्याजामध्ये एक रकमी समझोता योजनेअंतर्गत व्याजामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे.