वेंगुर्लेतील बालचमूचा ''राजगड'' प्रथम

वेंगुर्लेतील बालचमूचा ''राजगड'' प्रथम

Published on

swt१२६.jpg
७४९९३
वेंगुर्लेः राजगड किल्ल्याला राज्यस्तरावर प्रथम प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मुलांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले.

वेंगुर्लेतील बालचमूचा ‘राजगड’ प्रथम
राज्यस्तरीय स्पर्धाः भटवाडी ग्रामस्थांकडून मुलांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ः भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूने साकारलेल्या राजगड किल्ल्याला राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. याबद्दल भटवाडी ग्रामस्थांनी मुलांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले.
शिवसृष्टी पुणे आयोजित ''गड किल्ल्यांचे करुया संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचे करुया जतन'' या राज्यस्तरीय ऑनलाईन किल्ले बांधणी स्पर्धेत वेंगुर्ले-भटवाडी येथील बालगणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राज्यातून वयोगटनुसार एकूण २७० संघ सहभागी सहभागी झाले होते. तर तिसऱ्या गटातील १०६ संघातून भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. सवेश सादरीकरणाने बनविलेल्या राजगड किल्ल्याविषयी माहिती देताना किल्ल्यावरील तटबंदी, पाण्याची सोय, दरवाजे, तोफखाना याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी निवडलेले किल्ले, तयार केलेले मावळे याबाबत राज्यस्तरीय किल्ला बांधणी स्पर्धेत सहभागी होत केलेल्या राजगड किल्ल्याची माहिती उत्स्फूर्तपणे दिली. हा किल्ला बनविताना स्वच्छतेचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व सांगणारे फलक स्वतः तयार करीत मुलांनी सुशोभीकरणही केले होते.
यामध्ये चैतन्य केसरकर, ईशिता माईणकर, यश्मित सातार्डेकर, केतकी आपटे, चिन्मय पेडणेकर, कृत्तिका माईणकर, यशश्री केसरकर, तन्मय सातार्डेकर, हर्षल परब, वेदांत सातार्डेकर, सानिका पेडणेकर, भूमिका परब, सानिका वरसकर, अमिषा आडणेकर, संजना पेडणेकर, चिन्मयी पेडणेकर, काजल निकम, गौरव सातार्डेकर, गीतेश वरसकर, गौरव वरसकर, अक्षय पेडणेकर या लहान मुलांनी किल्ला बनविण्यासाठी सहभाग घेतला. या सर्वांना बिपिन वरसकर, लक्ष्मण केसरकर, राघोबा केसरकर, पविण सातार्डेकर, पशांत आपटे, सुनिल नांदोसकर, रोहन नांदोसकर, निलेश भगत, नारायण पेडणेकर, अशोक पेडणेकर, विनोद वरसकर यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com