पराडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न व्हावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पराडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न व्हावेत
पराडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न व्हावेत

पराडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न व्हावेत

sakal_logo
By

swt1213.jpg
74988
सावंतवाडीः बाबुराव पराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतेवेळी पत्रकार बांधव.

पराडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न व्हावेत
बबन साळगावकरः सावंतवाडीत स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाप्रमाणेच सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांचेही स्मारक जिल्ह्यात व्हावे, यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पराडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उद्योजक तथा बांधकाम व्यवसायिक दिनेश नागवेकर, राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, अमोल टेंबकर, प्रवीण मांजरेकर, रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, सत्यजित धारणकर, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, राजेश मोंडकर, विजय देसाई, दीपक गावकर, प्रशांत सावंत, रुपेश पाटील, शुभम धुरी, विनायक गांवस, आनंद धोंड, शैलेश मयेकर, भुवन नाईक, प्रसन्ना गोंदावळे उपस्थित होते.
श्री. साळगावकर पुढे म्हणाले, "आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह मालवण-पराड गावचे सुपुत्र आणि हिंदी पत्रकारितेचे पितामह पराडकर यांचे राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारितेसाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाळशास्त्रींचे स्मारक होण्यासाठी जसे प्रयत्न करण्यात आले, त्याचप्रमाणे पराडकर यांचे स्मारक होण्यासाठी सुद्धा आता प्रयत्न करा. या दोन्ही आद्य पत्रकारांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या पत्रकारितेतून आवाज उठवला होता. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पुन्हा स्वातंत्र्यासाठी येत्या काळात लढा उभारावा लागणार आहे. त्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. त्यासाठी पत्रकारांनी या दोन्ही आद्य पत्रकारांचा वारसा पुढे चालवावा." याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्या मनोगतातून पराडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.